Tuesday, May 21, 2024

जीवे मारण्याच्या धमकीनंतर कॅटरिना कैफने शेअर केली पहिली पोस्ट, लिहिली ‘ही’ गोष्ट

बॉलिवूड स्टार कपल कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी २८ वर्षीय मनविंदर सिंग हा लखनऊचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफसोबतचे लग्न न तोडल्यास विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती.

आरोपीच्या अटकेनंतर कॅटरिनाने पहिला फोटो केला पोस्ट
आरोपीच्या अटकेनंतर कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पहिली पोस्ट टाकली आहे. पोस्टमध्ये कॅटरिना जिम करताना दिसली. तिने या फोटोला कॅप्शन दिले, “बॅक टू जिम.” अवघ्या काही तासांत या फोटोला ४ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. (katrina kaif shares first update after death threat)

मनिंदरला करायचे होते कॅटरिना कैफशी लग्न
कॅटरिना कैफ आणि विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी मनविंदरने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये कॅटरिनाचा उल्लेख पत्नी म्हणून केला आहे. त्याने लग्नाचे मॉर्फ केलेले फोटो देखील पोस्ट केले आहेत. मनविंदर गेल्या काही महिन्यांपासून सांताक्रूझ पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये राहत होता आणि येथून तो विकी कौशलला धमकीचे मेसेज पाठवत होता.

अनेक महिन्यांपासून कॅटरिनाचा पाठलाग करत होता मनविंदर
जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर विकी कौशलने पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली. त्याने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सांगितले की, आरोपी गेल्या काही महिन्यांपासून कॅटरिनाचा पाठलाग करत होता. तिला धमकावत इन्स्टाग्रामवर शिवीगाळ आणि अश्लील मेसेजही करत होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा