‘माझ्या मुलांना दोघांचे प्रेम मिळाले पाहिजे’, लग्नानंतर मुलांच्या प्लॅनिंगबद्दल ‘असे’ आहेत कॅटरिना कैफचे विचार


शानदार अंदाजात कॅटरिना आणि विकी यांनी लग्न केले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. त्या दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी ज्यापद्धतीने तयारी चालू होत्या त्यावरून सर्वांनाच या लग्नाचाच अंदाज आला होता. खासगी मात्र अलिशान पद्धतीने त्यांनी धुमधडाक्यात लग्न केले. ज्या पद्धतीच्या बातम्या समोर येत होत्या, त्या ऐकून, वाचून तरी वाटत होते की, विकी आणि कॅटरिना लवकर त्यांच्या लग्नाचे फोटो सर्वांसोबत शेअर करणार नाही. मात्र त्यांनी देखील फॅन्सचे त्यांच्यावरील प्रेम पाहता त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आणि क्षणार्धात ते व्हायरल झाले. कॅटरिना आणि विकीचा शाही लूक पाहून सर्वांनाच खूप आनंद झाला. लग्नाबद्दल या दोघांनी खूप आधीपासूनच विचारपूर्वक प्लॅनिंग केली होती. त्याचाच त्यांना फायदा झाला आणि लग्न उत्तम पद्धतीने संपन्न झाले. मात्र तुम्हाला माहित आहे का, की कॅटरिनाने तर तिच्या मुलांचे देखील प्लँनिंग करून ठेवले आहे.

एका मुलाखतीमध्ये कॅटरिनाने तिचे मुलांबद्दल असलेले विचार सांगितले होते. ती म्हणाली होती की, “मी लहान असतानाच माझे वडील माझ्या आईला आणि आम्हाला भावंडाना सोडून निघून गेले. ते गेल्यापासून माझ्या आईनेच आम्हाला मोठे केलं. मला नेहमीच माझ्या वडिलांची कमी जाणवायची. वडील नसल्याचे दुःख मुलांना खूप त्रास देते. मलाही या गोष्टीचा त्रास झाला आहे. यासाठीच मला वाटते की जेव्हा मला मुलं होतील तेव्हा त्यांना आई आणि वडील दोघांचेही प्रेम मिळावे. जेवढी आई मुलांवर संस्कार करते तेवढेच वडील देखील करतात. मुलांना आईचे प्रेम आणि वडिलांचा आधार खूप महत्वाचा असतो.”

पुढे कॅटरिना म्हणाली की, “आई किंवा वडील या दोघांपैकी एकही नसतो तेव्हा मुलं मानसिकरीत्या कमजोर होतात किंवा त्यांना त्रास देखील होतो. मी या सर्व गोष्टींमधून गेली असल्याने मला त्याची जाणीव आहे. त्यामुळे माझ्या मुलांना आई आणि वडील दोघांचे प्रेम मी देणार आहे.” कॅटरिना आणि विकी यांनी राजस्थान येथील सवाई माधेपूर येथे ९ डिसेंबर रोजी कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले.

हेही वाचा :

जाणून घ्या कॅटरिना आणि विकी यांच्या लग्नातील लुकबद्दल आणि काही खास गोष्टींबद्दल

पदार्पणातच अमिताभ बच्चन यांच्यासोबत कॅडबरीची जाहिरात करणाऱ्या अंजनाने केला होता डिप्रेशनचा सामना

साताजन्माची गाठ! विकी आणि कॅटरिनाने लग्नातील सुंदर फोटो केले शेअर, तुम्हीही पाहिल्याशिवाय राहणार नाही


Latest Post

error: Content is protected !!