साताजन्माची गाठ! विकी आणि कॅटरिनाने लग्नातील सुंदर फोटो केले शेअर, तुम्हीही पाहिल्याशिवाय राहणार नाही


बॉलिवूडमधील एक लग्न मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तसे तर सगळ्याच कलाकारांची लग्न चर्चेत राहिली आहेत. मात्र, ज्या कलाकारांचे साथीदार चित्रपटसृष्टीतील आहेत, त्यांच्या लग्नाच्या सर्वात जास्त चर्चा झाल्या आहेत. अशातच मागील अनेक दिवसांपासून कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची चर्चा चालू होती. ते दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, या बातमीने सगळेच खुश झाले होते. मात्र, त्यांनी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली नव्हती. अशातच त्यांचे राजस्थानमध्ये लग्न झाले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो नुकतेच त्या दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कॅटरिनाने वरमाळा घालताना आणि सात फेरे घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ते दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. कॅटरिनाने लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. तसेच हातात चुडा आणि हेवी ज्वेलरी घातली आहे. तिच्या गळ्यात सुंदर असे छोटेसे मंगळसूत्र दिसत आहे. विकीने शेरवानी आणि डोक्यावर फेटा घातला आहे. ते दोघेही या फोटोमध्ये खूप खुश दिसत आहेत. (Vicky kaushal and katrina kaif wedding photos viral on social media)

हे फोटो शेअर करून कॅटरिनाने लिहिले आहे की, “या नवीन प्रवासाची एकत्र सुरुवात करताना तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद तसेच आम्हाला या क्षणापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आमच्या अंतःकरणात फक्त प्रेम आणि कृतज्ञता आहे.” तिने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार देखील त्यांना त्यांच्या नवीन आयुष्याच्या शुभेच्छा देत आहेत.

विकी कौशलने देखील सेम फोटो आणि कॅप्शन सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची सगळ्यांना आतुरता होती. अखेर त्यांचा लग्नसोहळा थाटात पार पडला आहे. त्यांनी त्यांच्या लग्नात कोणालाही मोबाईल आणण्यास परवानगी दिली नव्हती. कारण, त्यांना त्यांच्या लग्नाचे फोटो इतर कोणीही शेअर केलेले आवडणार नव्हते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!