Wednesday, July 3, 2024

केबीसीमध्ये जया बच्चन यांनी केला असा खुलासा, बिग बीच्या अश्रूचा बांध फुटला!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 11 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. बिग बी 80 वर्षांचे होणार आहेत. बिग बी यांच्या पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati 14) मध्ये वाढदिवसाच्या स्पेशल एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत. जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी हॉट सीटवर बसतील यावेळी अमिताभ बच्चन त्यांना प्रश्न विचारणार आहेत. हे दोघेही होस्ट अर्थात अमिताभ बच्चन यांना काही भूतकाळातील क्षणांची आठवण करून देताना दिसतात.

या एपिसोडचा प्रोमो सोनी टिव्हीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दिसत आहे की, शोची सुरुवात अभिषेक बच्चनच्या एन्ट्रीने होते आणि नंतर हॉटसीटवर बसल्यानंतर अभिषेक आपली आई अर्थात जया बच्चन यांचे स्वागत करतो. तो म्हणतो, “रिश्ते में जो हमारी माँ लगते है.” यानंतर जया बच्चन शोमध्ये प्रवेश करते. जया बच्चन यांना पाहून बिग बींचे डोळे भरुन येतात. जया बच्चन आणि बिग बी एकमेकांना मिठी मारताना दिसतात.

 

View this post on Instagram

 

या प्रोमोमध्ये पुढे असे दाखवण्यात आले आहे की, जया आपल्या चाहत्यांना अशी एक वैयक्तिक आयुष्यातील चाहत्यांना माहीत नसलेली गोष्ट सांगतात जी ऐकल्यावर अमिताभ यांना आपलं अश्रू आवरणं कठीण होऊन बसतं. त्या म्हणतात,”प्रेक्षकांना मला हे सांगावसं वाटतं… ”,आणि ही गोष्ट ऐकल्यावर अमिताभच्या अश्रूचा बांध फुटतो. मात्र, जया बच्चन नेमके काय म्हणतात हे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले नाही ते पूर्ण केबीसीच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये दाखवण्यात येणार आहे. पण हा प्रोमो पाहून या एपिसोडमध्ये नेमकं काय झालं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

बिग बींच्या वाढदिवसाच्या स्पेशल एपिसोडच्या आणखी एका प्रोमोमध्ये बिग बी स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसतात आणि हूटरच्या आवाजाने ते थक्क होत असल्याचे दिसतात. हूटर म्हणाला, “खूप लवकर खेळ संपवला” आणि नंतर त्याच्या “कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है” या लोकप्रिय गाण्यातील त्याची ओळ पार्श्वभूमीत वाजते आणि ते अभिषेक बच्चनला मिठी मारतात. यावेळी ते भावूक होतोत. हा स्पेशल एपिसोड ‘KBC 14’ तुम्हाला सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.

या प्रोमोवर एका प्रेक्षकानं प्रतिक्रिया दिली आहे की,’टीझर पाहून आम्हीही भावूक झालो आहोत.आता ११ ऑक्टोबरच्या एपिसोडची आम्ही मनापासून वाट आहोत’.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –

फॅन मूव्हमेंट! मनित जौरा म्हणाला,’संजय दत्तला पाहून…’
शरद पवारांचे हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘सगळ्यात जास्त योगदान मुस्लिमांचेच…’

हे देखील वाचा