Wednesday, June 26, 2024

अवघ्या 11 वर्षांच्या आदित्यची ‘बिग बीं’च्या शोमध्ये कमाल, पर्याय न वाचताच झटपट दिली प्रश्नांची उत्तरे

कौन बनेगा करोडपती ज्युनियर्स‘च्या मंचावर लिटिल मास्टर्स धमाल करत आहेत. केबीसी ज्युनियर्सच्या मंचावर आलेला हा लिटिल उस्ताद अमिताभ बच्चनच नव्हे तर प्रेक्षकांनाही आपल्या ज्ञानाने आश्चर्यचकित करतो. आत्तापर्यंत अनेक छोटे स्पर्धक या शोमध्ये आले आहेत. केबीसी ज्युनियर्स सतत प्रसिद्धीच्या झोतात आहेत. अशातच यावेळी 11 वर्षांचा निरागस आदित्य केबीसी ज्युनिअर्समध्ये पोहोचला आणि त्यांचे ज्ञान, देशाप्रती असलेली तळमळ पाहून अमिताभही आश्चर्य चकीत झाले.

कौन बनेगा करोडपती ज्युनियर्स ((kaun banega crorepati juniors) याच्या फास्टेस्ट फिंगर्सच्या पहिल्या फेरीत 11 वर्षांचा आदित्य श्रीवास्तव (aditya srivastava) प्रथम उत्तर देऊन अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्यासमोर हॉट सीटवर पोहोचला. आदित्यचे ज्ञानाचे भांडार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. यादरम्यान प्रश्नोत्तरांसोबत अनेक मजेदार गोष्टी घडल्या, पण आदित्यच्या एका गोष्टीने बिग बींचे मन जिंकले. या शोच्या एपिसोडचा प्रोमो सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

यामध्ये तुम्ही पाहू शकता की, बिग बी सर्वप्रथम प्रेक्षकांना आदित्यबद्दल सांगतात. अभिनेता म्हणताे, “मला तुम्हाला सांगायचे आहे की, आदित्य 11 वर्षांचा आहे आणि तो अंतराळाचे स्वप्न पाहतो. तो म्हणाला होता की, ‘तो मोठा झाल्यावर त्याला नासामध्ये जायचे नाही, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत जॉईन करायचे आहे. कारण, त्याला देश आणि अवकाश दोन्ही आवडतात.’ असे अमिताभ यांनी सांगितले.”

आदित्यचे म्हणणे ऐकल्यानंतर त्याचे ज्ञान पाहून बिग बी आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या विचारसरणीला सलाम करूया, असे ते म्हणाले. यानंतर बिग बींनी आदित्यला स्पेसबद्दल काही खास गोष्टी सांगण्यास सांगितले आणि त्याने सर्व प्रश्नांची उत्तरेही अतिशय हुशारीने दिली. यावर अमिताभ बच्चन हसत हसत म्हणाले, “मन म्हणत की, दिवसभर तुझ्यासमाेर बसून बाेलत रहाव.”

खेळादरम्यान अमिताभ बच्चन यांनी आदित्यला कोणताही प्रश्न विचारला की, स्पर्धक तो पर्याय न ऐकता त्याबद्दल उत्तर सांगताे आणि सर्वांना आश्चर्य करताे. (kaun banega crorepati juniors contestant aditya srivastava surprise actor amitabh bachchan with his unbelievable knowledge)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मालिकेच्या सेटवर एकमेकांसोबत घालवला वेळ अन् पडले प्रेमात, 11 डिसेंबरला करणार लग्नाचा पहिला वाढदिवस

‘क्या कीजे’ गाण्याचा नवीन अल्बम, प्रतिभा सिंग यांच्या आवाजात ऐकाल अपूर्ण लव्हस्टोरी

हे देखील वाचा