‘कौन बनेगा करोडपती’ हा शो प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करत आहे. आता या शोचे १३ वे पर्व सुरू आहे. या शोलाही प्रेक्षकांची जोरदार पसंती मिळत आहे. या शोमध्ये येणाऱ्या सामान्य स्पर्धकांची कहाणी प्रेक्षकांना प्रभावित करते, तर दुसरीकडे शोमध्ये आलेले कलाकार प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. प्रत्येक शुक्रवारी शोमध्ये एक खास एपिसोड प्रदर्शित होतो. यादरम्यान खास पाहुणा शोचा भाग बनतो. यावेळी शोच्या हॉट सीटवर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी, तसेच अभिनेत्री जिनिलिया देशमुख बसणार आहेत.
नुकतेच सोनी चॅनेलने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शुक्रवारी (०७ ऑक्टोबर) प्रसारित होणाऱ्या या शोचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत शोमध्ये पाहुणे म्हणून रितेश आणि जिनिलिया होस्ट अमिताभ बच्चनसोबत जोरदार मस्ती करताना दिसत आहेत. (KBC 13 Actor Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Will Be Part of The Show This Week)
या व्हिडिओत एक मजेशीर किस्सा पाहायला मिळत आहे. खरं तर, शोचे होस्ट अमिताभ बच्चन रितेश आणि जिनिलियाला विचारतात की, “हे सांगा की, तुम्ही कोणत्या प्रकारची तयारी करता?” या प्रश्नाचे उत्तर देताना जिनिलिया म्हणते की, “म्हणजे तुमचा शो पाहतो, अमितजी अपेक्षा आहे की, माझे जीके थोडे ठीक आहे.”
यानंतर अमिताभ रितेशकडे पाहू लागतात. यावर रितेश म्हणतो की, “माझी सोपी तयारी आहे. मी आपली लाईफलाईन आपल्या पत्नीसोबत घेऊन आलो आहे. कारण तिची मेमरी खूपच कमालीची आहे. म्हणजे तिला आजही २० वर्षांपूर्वी आम्ही जो चित्रपट केला होता, ‘तुझे मेरी कसम’ची तारीख लक्षात आहे.”
व्हिडिओत रितेश सांगतो की, “जिनिलियाला आजही आठवते की, २० वर्षांपूर्वी कोणत्या दिवशी कोणते स्केड्युल कुठे होते.” रितेशच्या या वक्तव्यावर अमिताभ बच्चन मजेशीर अंदाजात काहीतरी बोलतात, जे ऐकून उपस्थित प्रेक्षक हसून हसून लोटपोट होतात.
पुढे अमिताभ म्हणतात की, “हे मेमरी वेगवान होण्याचे फायदेही असतात. परंतु भाई साहब गडबडही खूप होते. कारण अनेक गोष्टी आपल्या पत्नींना लक्षात न राहो अशी आपली इच्छा असते.” यावर रितेशही आपली सहमती दर्शवतो. दुसरीकडे जिनिलिया यावर विचित्र प्रतिक्रिया देते.
यानंतर अमिताभ बच्चन प्रेक्षकांना विचारतात की, इथे उपस्थित सर्व पुरुष या गोष्टीशी सहमत आहेत की नाही? यावर सर्व पुरुष आपले हात वर करून आपली सहमती दर्शवतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बिग बॉसपेक्षा जास्त पैसे मी बाहेर राहून कमावू शकते, म्हणत ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीने धुडकावली ऑफर