Wednesday, July 3, 2024

‘केबीसी १३’मध्ये महिला स्पर्धकाने ‘बिग बीं’ना विचारला ‘हा’ प्रश्न, अभिनेते म्हणाले, ‘मी सांगणार नाही…’

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती १३’ सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. अमिताभ हे स्पर्धकांसोबत वैयक्तिक गोष्टीही शेअर करताना दिसत असतात. ‘बिग बीं’नी त्यांच्या बालपणीच्या कथाही अनेकवेळा या शोमध्ये सांगितल्या आहेत आणि अनेकवेळा त्यांची नात आराध्याचाही उल्लेख केला आहे. हा शो स्पर्धकांना करोडपती आणि लखपती बनवतोच, पण बिग बींशी स्पर्धकांनी साधलेला संवाद प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतो. लोकांना आरामदायक वाटण्यासाठी बिग बी स्पर्धकांसोबत खूप विनोद करतात. मात्र, जर स्पर्धक स्वतः बिग बींना प्रश्न विचारू लागला तर…? आगामी भागात असेच काही घडणार आहे. जिथे एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने ‘बिग बीं’च्या कपड्यांविषयी असे प्रश्न विचारले की, उत्तर देताना ते स्वतःही अस्वस्थ झाले.

अलीकडेच, सोनी टीव्हीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये ओशीन नावाची एक स्पर्धक बिग बींसोबत खूप मजा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसते की, ओशीन प्रथम तिचा परिचय देणारा व्हिडिओ रेकॉर्ड करते. यानंतर बिग बी तिला विचारतात की इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? आणि ओशीन बिग बींना इन्फ्लुएन्सरबद्दल सांगते. यानंतर ओशीन त्यांना सांगते की, तिला काही प्रश्न विचारायचे आहेत. बिग बींना हे ऐकून धक्का बसला, पण नंतर ते प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार झाले.

ओशीन बिग बींचा फोटो दाखवते आणि त्यांना जॅकेटबद्दल विचारते, त्यांना हे जॅकेट कुठून मिळाले? सुरुवातीला, बिग बी याचे उत्तर देतात आणि म्हणतात की, ते सांगणार नाही. पण नंतर ते सांगतात की, हे त्यांना अभिषेक बच्चनने भेट दिले आहे.

बिग बींना नातीने दिलेली ही भेट
यानंतर बिग बींचा आणखी एक फोटो दाखवण्यात आला आहे. त्याचवेळी दुसऱ्या प्रश्नात, ओशीन बिग बींना त्यांच्या चष्म्याबद्दल विचारते. या फोटोत ते अतिशय स्टायलिश आणि चष्मा आणि गोल्डन बर्थडे कॅप घातलेले दिसत आहेत. चष्म्यासंदर्भात, ओशीन विचारते की, तो कोठून आणला आहे. यावर बिग बी म्हणाले की, तो त्यांना त्यांची नात आराध्याने भेट दिला होता. यानंतर, स्पर्धक बिग बींचे आणखी दोन फोटो दाखवते आणि त्यांना छान म्हणते. बिग बी आणि ओशीनच्या संभाषणाचा हा व्हिडिओ खूप मजेदार आहे.

आगामी भागात बिग बींच्या सूटबद्दल केली तक्रार
मुलगा आणि नात यांच्या भेटवस्तूंबद्दल सांगितल्यानंतर बिग बींनी इतर दोन फोटोंची माहिती दिली. त्यांची शोमधील मस्ती प्रेक्षकांना खूप आवडते. आगामी भागात प्रांशु हॉट सीटवर बसणार आहे. शोचा एक प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रांशु बिग बींकडे त्यांच्या सूटला असलेल्या खिशाची तक्रार करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने केला परफेक्ट फॅमिली फोटो शेअर, समुद्र किनारी दिसले ‘सैफिना’चे कुटुंब

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

हे देखील वाचा