Tuesday, July 9, 2024

अमिताभ बच्चन यांच्या मुलांमुळे जॅकी श्रॉफ यांची ‘ही’ इच्छा राहिली होती अपूर्ण; स्वत: केला खुलासा

‘कौन बनेगा करोडपती’ १३ या शोमध्ये सर्वच जण करोडपती व्हायचं म्हणूनच येतात असं नाही. काही व्यक्ती यामध्ये आपल्या बुद्दीला चालना देण्यासाठी आणि स्वतःमधील ज्ञान तपासण्यासाठी देखील येत असतात. अशात लवकरच या शोमध्ये तल्लक बुद्धीचे अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी देखील झळकणार आहेत. या शोमध्ये ते पाहुणे म्हणून येणार आहेत. त्यांचा प्रोमो व्हिडिओ चॅनेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

आजवर तुम्ही या दोघांचे अनेक चित्रपट पाहिले असतील. या शोच्या माध्यमातून ते प्रश्नांची उत्तरे देताना दिसणार आहेत. तसेच त्यांच्या चित्रपटांमध्ये झालेले किस्से आणि बिग बीं बरोबर गप्पा गोष्टी करताना दिसणार आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या प्रोमोमध्ये जॅकी श्रॉफ सांगताना दिसत आहेत की, अमिताभ बच्चन यांच्या मुलांमुळे म्हणजेच अभिषेक आणि श्वेतामुळे त्यांच्या मनातील इच्छा कशी अर्धवट राहिली होती. त्यांनी सांगितलेल्या किस्स्यावर अमिताभ बच्चन आणि सुनील शेट्टी खूप हसताना देखील दिसत आहेत. यासह जैकी श्रॉफ त्यांच्या ‘भिडू’ या शब्दाविषयी देखील बोलले आहेत.

या प्रोमोमध्ये जॅकी श्रॉफ अमिताभ बच्चन यांना सांगत आहेत की, “एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आपण दोघे चेन्नईमध्ये आलो होतो. मला जेव्हा समजले अमिताभ बच्चन देखील इथे आले आहेत. तसा मी तुमचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपड करू लागलो. रस्त्यामध्ये मला तुम्ही तुमच्या मुलांबरोबर दिसलात. मी तिकडे येणारच होतो, तेवढ्यात एका मुलाबरोबर अभिषेक आणि श्वेता माझ्याजवळ आले. तो मुलगा मला म्हणाला की, ही अमिताभ बच्चन यांची मुलं आहेत यांना तुमचा ऑटोग्राफ पाहिजे. त्यावेळी मी हसत म्हणालो, अरे मलाच यांच्या वडिलांचा म्हणजे बिग बींचा ऑटोग्राफ हवा आहे. मला ज्या अभिनेत्याचा ऑटोग्राफ पाहिजे त्यांचीच मुलं माझ्याकडे ऑटोग्राफ मागत आहेत. व्वा क्या बात है.” यानंतर सेटवर सर्वत्र एकच हशा पिकला.

‘भिडू’ विषयी अमिताभ जॅकी यांना प्रश्न विचारत म्हणतात की, “हा शब्द कोठून आला?” त्यावर उत्तर देत जॅकी सांगतात की, “खरं, तर हा शब्द तिथून आला ज्या क्षेत्रासाठी मी जन्माला आलो, लहानाचा मोठा झालो. तसेच तुमच्यामुळे देखील हा शब्द आला. कारण आमच्या आधी तुम्हीच सिनेसृष्टी गाजवली आहे. तुमच्यानंतर आम्ही आलो.”

या शोमध्ये सामान्य नागरिकांपासून मोठे कलाकार आणि क्रिकेटर देखील येत असतात. काही दिवसांपूर्वीच वीरेंद्र सहवाग आणि सौरव गांगुली हॉट सीटवर बसले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम

-लग्नानंतर प्रथमच बिकिनीमध्ये दिसली दिशा परमार; मालदीवमध्ये पती राहुलसह करतेय सुट्ट्या एन्जॉय

-‘मनिके मागे हिते’ गाण्याची लोकप्रियता पोहचली शिगेला; इंग्रजी, हिंदी, तामिळ अन् आता भोजपुरी व्हर्जनही झालं रिलीझ

हे देखील वाचा