Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

दोन हजारच्या नोटेत चीप आहे का?’ अमिताभ बच्चन यांनी विचारला प्रश्न, महिलेचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यांच्या कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे,ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे. त्याआधीच कार्यक्रमाच्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी एक गमतीशीर प्रश्न विचारल्याचे दिसत आहे. काय आहे नक्की हा व्हिडिओ चला जाणून घेऊ. 

महानायक अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपतीचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये बिग बी पुन्हा एकदा हॉट सीटवर बसलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ सोनी टीव्हीच्या अधिकृत ट्विट हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन गुड्डी नावाच्या स्पर्धकाला प्रश्न विचारताना दिसत आहेत. बिग बी विचारतात की यापैकी कोणाकडे जीपीएस तंत्रज्ञान आहे ? अ) टायपरायटर, ब) टेलिव्हिजन, सी) सॅटेलाइट आणि ड) ₹ 2000 ची नोट…

प्रश्न ऐकल्यावर, महिलेने D 2000 नोटचा पर्याय निवडला. त्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले की, तुमचे उत्तर चुकीचे आहे. यावर महिलेचे म्हणणे आहे की, मी हे न्यूज चॅनलवर पाहिले आहे. तेव्हा बिग बी उत्तर देतात आणि म्हणतात की यात त्यांची चूक नसेल, पण नुकसान तुमचेच आहे. KBC 2022 चा हा प्रोमो व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. त्यामुळेच हा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करत “अशा असत्य खळबळजनक बातम्या ऐकणाऱ्या अशा माणसाला आपण सर्वजण ओळखतो. त्याला टॅग करा आणि सांगा की ज्ञान कुठूनही मिळवा पण आधी त्याची सत्यताही तपासा,”असा कॅप्शन दिला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

हे देखील वाचा