Sunday, October 6, 2024
Home कॅलेंडर केबीसीच्या इतिहासातील करोडपती स्पर्धक, आज कुणी आहे राजा तर कुणी झालंय रंक

केबीसीच्या इतिहासातील करोडपती स्पर्धक, आज कुणी आहे राजा तर कुणी झालंय रंक

‘कौन बनेगा करोडपती’ हा प्रश्नमंजुषेवर आधारित शो मागच्या एक दशकांपेक्षा जास्त काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांच्या ज्ञानात भर पाडत आहे. प्रत्येक बरोबर प्रश्नांसोबत काही रक्कम देणारा हा शो तुम्हाला करोडपती सुद्धा बनवतो. दहा हजार रुपयांपासून सुरु होणारे प्रश्न सात करोड रुपयांवर थांबतात. ह्या शोतुन मिळणाऱ्या रक्कमेमुळे लोकांच्या आर्थिक समस्या कमी करण्यासाठी मदत केली जाते. या शोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचे खुमासदार सूत्रसंचालन. या शोने सामान्य माणसाचे करोडपती होण्याचे स्वप्न साकार केले आहे. ह्या शोने सुरु झाल्यापासून आजपर्यंत अनेक लोकांना करोडपती केले आहेत. काही लोकांनी या पैशातून नवीन सुरुवात केली तर काहींनी हे सर्व पैसे गमावत पुन्हा हलाखीचे जीवन जगायला सुरुवात केली आहे. आज आपण अशाच काही करोडपती झालेल्या लोकांची आजची परिस्थिती कशी आहे हे जाणून घेणार आहोत.

हर्षवर्धन नवाथे- १ करोड रुपये
२००० साली केबीसीच्या पहिल्या पर्वात हॉटसीटवर आलेल्या २७ वर्षाच्या हर्षवर्धन नवाथे यांनी एक करोड रुपये जिंकत इतिहास रचला होता. हर्षवर्धन हे फक्त त्याच पर्वातले नाही ते केबीसीच्या इतिहासातले पहिले करोडपती ठरले. या शोमध्ये येण्यापूर्वी हर्षवर्धन हे सिविल सर्विसच्या परीक्षांची तयारी करत होते. मात्र शो जिंकल्यानंतर त्यांनी या रक्कमेतून यूके युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले. त्यानंतर त्यांनी मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री सारिका नीलत्कर सोबत लग्न केले. आता हर्षवर्धन हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करत आहेत.

रवि मोहन सैनी – १ करोड रुपये
२००१ साली झालेल्या केबीसी जुनियरमधील स्पर्धक रवी मोहन सैनी याने या शोमध्ये येत आपल्या ज्ञानाने सर्वाना आश्चर्यचकित केले होते. रवीने संपूर्ण १५ प्रश्नांची अचूक उत्तरं देत एक करोड रुपये जिंकले होते. त्यावेळी रवी १० वीचा विद्यार्थी होता. आज रवीने त्या पैशांनी चांगले शिक्षण घेतले असून, तो एक आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

राहत तस्लीम – १ करोड रुपये
राहत ही एक  मध्यमवर्गीय परिवारातून आलेली मुलगी. राहत या शोच्या चौथ्या पर्वात आली होती. त्यांनी १५ प्रश्नांचे बरोबर उत्तरं देत एक करोड रुपये मिळवले होते. शिवाय त्या केबीसीच्या इतिहासातील पहिल्या महिला करोडपती होत्या. त्या करोडपतीमध्ये आल्या तेव्हा मेडिकल परीक्षेची तयारी करत होती, मात्र केबीसीमध्ये एक करोड जिंकल्यानंतर त्यांनी झारखंडमध्ये गारमेंटचा उद्योग सुरु केला असून त्यांचा हा उद्योग खूप यशस्वी झाला आहे.

सुशील कुमार – ५ करोड
एक करोड जिंकल्यानंतर स्लमडॉग मिलिनियर म्हणून सुशील कुमार ओळखले गेले. त्यांनी केबीसीच्या पाचव्या पर्वात सहभाग घेतला होता. पाच करोड रुपये जिंकणारे सुशील कुमार पहिले स्पर्धक होते. ते मनरेगामध्ये ६ हजार रुपयांची नोकरी करत होते. करोडपती झाल्यानंतर ते खूप प्रसिद्ध झाले. पण त्यांना हे फेम आणि पैसे टिकवता आले नाही. त्यांना यशामुळे नशा करण्याची सवय लागली शिवाय चित्रपट बनवण्याच्या हेतूने त्यांनी दिल्ली गाठली पण काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी सर्व पैसे गमावला. आता सुशील कुमार बिहारच्या एका शाळेत नोकरी करत आहे.

सुनमीत कौर- ५ करोड रुपये
सुनमीत यांनी पाच करोड रुपये केबीसीच्या सहाव्या पर्वात जिंकले. त्या फॅशन डिझयनिंग करत होत्या, मात्र त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना हे करायला परवानगी न दिल्याने त्यांनी मुलांना शिकवणी द्यायला सुरुवात केली. यातच त्यांच्या ज्ञानात खूप भर पडली, आणि त्या केबीसीमध्ये करोडपती झाल्या. सुनमीत यांनी या पैशांनी त्यांचा स्वतःचा फॅशन ब्रँड बाजारात आणला असून आता त्या त्यात काम करत आहेत.

ताज मोहम्मद रंगरेज – १ करोड 
ताज मोहम्मद रंगरेज यांनी सातव्या पर्वात एक करोड रुपये जिंकले होते. इतिहासाचे शिक्षक असलेले ताज मोहम्मद रंगरेज यांनी या पैशातून त्यांच्या मुलीच्या डोळ्यांचा उपचार करत दोन अनाथ मुलीचे लग्न देखील लावून दिले. शिवाय त्यांनी त्यांच्यासाठी एक घर देखील घेतले.

अचिन नरूला आणि सार्थक नरूला – ७ करोड 
अचिन आणि सार्थक नरूला या दिल्लीच्या दोन भावांनी केबीसीच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम ७ करोड जिंकत इतिहास रचला. या भावांनी या पैशातून त्यांच्या आईचा कॅन्सरवर उपचार करत एक चांगला आणि मोठा उद्योग सुरु केला. आज यांच्या उयोगाचा टर्नओव्हर करोडो रुपयांमध्ये आहे.

अनामिका मजूमदार १ करोड 
केबीसीच्या नवव्या पर्वात अनामिका यांनी एक करोड रुपये जिंकले. समाजसेविका असलेल्या अनामिका यांनी ही रक्कम त्यांच्या NGO च्या सुधारणेसाठी वापरली असून अजूनही त्या समाजसेविकेचे कार्य करत आहे.

बिनीता जैन- १ करोड रुपये 
बिनिता यांनी केबीसीच्या दहाव्या पर्वात १ करोड रुपये जिंकले. या पैशाचा वापर त्यांनी त्यांच्या घरासाठी करत मुलांच्या भविष्यासाठी तरतूद केली. बिनिता अजूनही गुवाहाटीमध्ये कोचिंग क्लासमध्ये टीचर आहेत.

केबीसीच्या सध्याच्या पर्वात आतापर्यंत सनोज राज, अजीत कुमार, बबीता ताड़े आणि गौतम कुमार झा हे करोडपती झाले आहेत.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा