Friday, April 19, 2024

Happy Birthday: केवळ अभिनयातच नाही, तर लव्हलाईफमध्येही यशस्वी आहे अभिनेता अंकुश चौधरी

मराठी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) होय. अंकुशने मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या चटकन लक्षात राहते. त्याच्या कोणत्याही चित्रपटाचे नाव घेताच त्याचा अभिनय लगेच डोळ्यासमोर येतो. त्याचमुळे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रेक्षकांचा लाडका अभिनेता म्हणून अंकुशचे नाव चाहत्यांच्या ओठांवर राहते. अभिनेता म्हणून अंकुशची चित्रपट कारकीर्द, तर लक्षात राहतेच. मात्र त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील तितकेच यशस्वी आहे. अंकुश मंगळवारी(31 जानेवारी) त्याचा 50वा वाढदिवस साजरा करत आहे.

चित्रपट कोणताही असूद्या त्यातील अंकुशची भूमिका मात्र लोकप्रिय होतेच. चित्रपट पाहताच अंकुशचे डायलॉग प्रेक्षकांच्या ओठावर येतात. तो नेहमीच चित्रपटांतील वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. स्वप्निल जोशीच्या ‘दुनियादारी’ या चित्रपटातील दिग्या असो किंवा ‘क्लासमेट’ चित्रपटातील सत्या. मात्र तुम्हाला माहित आहे का की, अंकुश चौधरी त्याच्या लव्हलाईफमुळे देखील चर्चेत राहिला आहे. चला तर मग त्याच्या वाढदिवशी त्याच्या लव्हलाईफबद्दल जाणून घेऊया.

मुंबईतील महर्षी दयानंद कॉलेजमध्ये अंकुश चौधरीने त्याचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये शिकताना अंकुशची त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अभिनेत्री दीपा परब हिच्याशी ओळख झाली. ही ओळख केवळ अभिनयामुळे झाली होती. अंकुश आणि दीपाला अभिनयाची खूप आवड असल्यामुळे, दोघेही त्यांच्या कॉलेजमध्ये नाटक आणि एकांकिका स्पर्धेत एकत्र भाग घेत असत. या दरम्यानच त्यांची मैत्री झाली पुढे मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये या दोघांनी अनेक नाटकं आणि एकांकिका सादर केल्या.

अंकुश आणि दिपाचे कॉलेज पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांच्यातील प्रेम कायम टिकून राहिले. जवळपास दोघांनीही एकमेकांना 10 वर्ष डेट केले. मात्र दहा वर्षानंतर अंकुश आणि दिपाने आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही आपल्या आयुष्याला एक नवे वळण देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.

त्यानंतर अंकुश आणि दिपाने 2006 मध्ये साखरपुडा करून चाहत्यांना आनंदाची गोड बातमी दिली. त्यानंतर केवळ एकाच वर्षात या दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. हे जोडपे 2007 मध्ये लग्नाच्या एका पवित्र बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला आता पंधरा वर्षे झाली असून, दोघेही सुखाचा संसार करत आहेत. लग्नानंतर आता या जोडप्याला प्रिन्स नावाचा एक गोंडस असा मुलगा देखील आहे. अशाप्रकारे अभिनयासोबत अंकुश त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील यशस्वी ठरला आहे.

अंकुश चौधरी करिअर
अंकुश चौधरीने ‘सुना येती घरा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यानंतर त्याने मराठीसोबतच हिंदी चित्रपटातही अभिनय केला. ‘जिस देश मे गंगा रहता है’ हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट होता. 2013 मध्ये ‘दुनियादारी’ या चित्रपटात त्याने साकारलेली ‘डीएसपी’ची भूमिका म्हणजेच दिगंबर शंकर पाटीलने, तर प्रेक्षकांवर भुरळ घातली.

‘आई शप्पथ’, ‘यांचा काही नेम नाही’, ‘रिंगा रिंगा’, ‘लालबाग परळ’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘दगडी चाळ’, ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांतून अंकुशने प्रेक्षकांच्या मनावर अमीट छाप सोडली.

केवळ अभिनयातच तो मर्यादित राहिला नाही, तर अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शक म्हणूनही त्याचे नशीब आजमवले आहे. ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. त्याचबरोबर केदार जाधवसोबत त्याने ‘अगंबाई अरेच्चा’ आणि ‘जत्रा’ या चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.(actor ankush chaudhary was in relation with deepa parab before marriage)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पवन सिंगच्या ‘कमरिया पतरे पतरे’ गाण्याने केले रेकॉर्ड, यूटुबवर मिळवले तब्बल ‘इतके’ कोटी व्ह्यूज

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांनी हाती बांधले घड्याळ, केला राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ

हे देखील वाचा