Monday, July 1, 2024

केरळ रुग्णालयाने मॉर्गन फ्रीमन यांचा त्वचेच्या उपचारासाठी वापरला फोटो, घटनेनंतर मागितली अधिकृत माफी

मॉर्गन फ्रीमन हे प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते आहे. त्यांची  फॅन फॉलोविंग जगभरात आहे. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना आवडतो. पण त्यांच्याशी संबंधित एक बातमी केरळमधून येत आहे. ज्येष्ठ अभिनेते मॉर्गन फ्रीमन यांच्या फोटोचा वापर करून केरळमधील एका रुग्णालयाने त्वचा उपचार सुविधांमध्ये भर घालण्यासाठी केला होता. यावर आता रुग्णालयाने माफी मागितली आहे.

वडकारा सहकारी रुग्णालयामार्फत जाहिरात केलेल्या सेवांमध्ये चामखीळ, त्वचेचे टॅग, मिलिया आणि मोलस्कम काढणे समाविष्ट होते. जाहिरातीमध्ये मॉर्गन यांना स्टँडीवर आणि संदेशात असे म्हटले आहे की, “तुमच्या त्वचेचे टॅग, डीपीएन, वॉर्ट्स, मिलिया, मोलस्कम आणि कॉमेडोन सहजपणे एकाच भेटीत ASHAN प्रक्रियेद्वारे काढून टाका.”

केरळ रुग्णालयाने आता मागितली आहे माफी

माध्यमांशी बोलताना वडकारा कोऑपरेटिव्ह हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड टी सुनील म्हणाले की, “अलीकडेच एक त्वचाविज्ञानी आमच्या बाह्यरुग्ण विभागात रुजू झाले. हॉस्पिटलमध्ये स्किन केअर उपचाराची सुविधा आहे, असा प्रचार करण्यासाठी हा फलक लावून चार दिवस तेथे ठेवण्यात आला. हे स्थानिक डिझायनरने बनवले आहे. माहिती आणि गांभीर्य नसल्यामुळे निष्काळजीपणे ओपीडीसमोर फलक लावण्यात आला. एका व्यक्तीने विचारले की, नेल्सन मंडेला यांचा फोटो ऍडसाठी का छापला? त्यानंतर आम्ही शनिवारी ते काढून टाकले.” मॉर्गन यांनी ‘इनव्हिक्टस’ (२००९) मध्ये नेल्सन मंडेला यांची भूमिका साकारली होती.

ते म्हणाले की, “मात्र, रविवारपर्यंत ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. आम्ही फेसबुकवर माफी मागितली. आम्ही समजतो की, फ्रीमन हे एक उत्कृष्ट कलाकार आहे ज्याची जगभरातील अनेकांनी प्रशंसा केली आहे. ज्ञानाच्या कमतरतेबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.”

याआधी सोशल मीडिया युजर्सनी हॉस्पिटलची बरीच खेचली होती. याबद्दल कमेंट शेअर केल्या आहेत. “अरे, देवा! केरळ सहकारी रुग्णालयाचा त्वचाविज्ञान विभाग मॉर्गन फ्रीमनचा फोटो वापरून दावा करत आहे की, ते एकाच भेटीत मस्से आणि त्वचेचे टॅग काढू शकतात. आदर आणि मूलभूत शिष्टाचार लोक दाखवा!

मॉर्गन फ्रीमन अनेक चित्रपटांमध्ये दिसणार

मॉर्गन आगामी थ्रिलर ‘द मिनिट यू वेक अप डेड’मध्ये काम करणार आहे. यात कोल हॉसर आणि जेमी अलेक्झांडर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट टिमोथी हॉलंडची मूळ पटकथा आहे. ज्याचे दिग्दर्शन मायकेल मेलर यांनी केले आहे आणि हॉलिवूडचे दिग्गज अँड्र्यू स्टीव्हन्स निर्मित आहे. माइलस्टोन स्टुडिओचे डॉन बर्स्टीन आणि अॅलन बी बर्स्टीन हे कार्यकारी निर्माते आहेत. त्यांना ऑस्कर पुरस्कार, स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘अनफॉरगिव्हन’, ‘द शॉशँक रिडेम्प्शन’, ‘मिलियन डॉलर बेबी’, ‘इनव्हिक्टस’, ‘द डार्क नाइट ट्रायलॉजी’ (२००५-२०१२), ‘लंडन हॅज फॉलन, द कमबॅक ट्रेल’ आणि ‘कमिंग २ अमेरिका’ यासह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.

हेही वाचा :

 

 

हे देखील वाचा