Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड नूतनशी लग्न करायचे शम्मी यांचे स्वप्न राहिले अधुरे, दुसऱ्याच मुलीचा भरावा लागला लिपस्टिकने भांग

नूतनशी लग्न करायचे शम्मी यांचे स्वप्न राहिले अधुरे, दुसऱ्याच मुलीचा भरावा लागला लिपस्टिकने भांग

बॉलिवूड अभिनेते शम्मी कपूर यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. वडील पृथ्वीराज कपूर यांच्या स्टुडिओमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली.  त्यांनी 1953मध्ये ‘जीवन ज्योती’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्यांच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिले आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त शम्मी कपूर (Shammi Kapoor) त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. त्याचवेळी शम्मी कपूर यांना अभिनेत्री नूतन आवडत होत्या. माध्यमांतील वृत्तानुसार, शम्मी कपूर आणि नूतन लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. एवढेच नाही, तर शम्मी यांना नूतन यांच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र नूतन यांची आई शोभना समर्थ या दोघांच्या नात्याला विरोध करत होत्या.

शम्मी कपूर यांचे पहिले लग्न त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांच्यासोबत झाले होते. चित्रपटाच्या सेटवरच दोघांची भेट झाली होती. एकत्र काम करताना दोघांनीही एकमेकांना ह्रदय दिले होते. शम्मी आणि गीता यांनी मंदिरात जाऊन लग्न केले होते.

शम्मी कपूर जेव्हा गीता बाली यांच्यासोबत लग्नासाठी मंदिरात पोहोचले, तेव्हा ते सिंदूर आणायला विसरले आहेत हे आठवले. त्यानंतर शम्मी यांनी गीता यांच्या लिपस्टिकमध्येच त्यांचा भांग भरला होता. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी गीता यांचे निधन झाले. काही वर्षांनी शम्मीने नीला देवीशी दुसरे लग्न केले.

अभिनेता शम्मी कपूर यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1931रोजी झाला. शम्मी कपूर हे उत्तम अभिनेते आणि उत्तम डान्सर होते. आजही चाहते त्याच्या गाण्यांवर नाचू लागतात. शम्मी कपूर यांचे आयुष्य सोपे नव्हते. शम्मी कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘तुमसा नहीं देखा’, ‘ब्रह्मचारी’, ‘कश्मीर की कली’, ‘प्रेम रोग’ आणि ‘विधाता’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा –
सिंदूर नसल्यामुळे शम्मी कपूर यांनी थेट भरली होती गीता बालींच्या भांगेत लिपस्टिक; खूपच रंजक आहे कहाणी
केवळ अभिनयासाठी नाही तर डान्ससाठी देखील प्रसिद्ध होते शम्मी कपूर, या आजाराने त्यांचा जीव घेतला

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा