मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे ही सतत आपल्या अभिनयामुळे परखड वक्तव्यामुळे ओळखली जाते. तिमे मराठी मालिका आणि कार्यक्रमांमधये काम केले आहे. तिने अनेकदा आपले परखड वक्तव्य केले असून तिला ट्रोलिंगचाही सामना काराव लागतो. मात्र, तरिही ती आपले मत मांडतच असते. ती गेल्या दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर सतत पोस्ट शेअर करत आहे त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे.
‘आंबट गोड’ या प्रसिद्ध मालिकेतून केतकी चितळे (Ketaki Chitale) घराघरात पोहोचली. यानंतर तिने अनेक कार्यक्रमामध्ये काम केले असून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने समाजात घडणाऱ्या घडामोडी असो किंवा राजकारण सतत आपल्या वादग्रस वक्तव्यामुळे केतकी वादाच्या घेऱ्या अडकत असते. त्याशिवाय तिने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही वाद निर्माण होईल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे तिला तुरुंगवासही सोसावा लागला होता. मात्र तरिही ती आपले मत मांडत असते.
केतीने भिमा कोरेगाव या विषयावरही परखड वक्तव्य करत वादाच्या घेऱ्यात अडकली आहे. तिला सोशल मीडियावर खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्याशिवाय तिने इंग्रजांना पाठिबबा देत भिम सैनिकांच्या भवना दुखावल्या आहेत. केतकी जेव्हा कधी वक्तव्य करते त्यामध्ये वाद होणं हे पक्क असतंच. मात्र, आता केतकीच्या त्या फोटोंवर चर्चा होत आहे जे तिने गल्या दोन दिवसांपूर्वी शेअर केले आहेत.
View this post on Instagram
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केतकीच्या हातावर काही अंक टॅटू म्हणून गोंदले आहेत मात्र, याचा अर्थ काय अर्थ असा प्रश्न अनेकांना पडला असून नेटकऱ्यांनी तिल विचारला होता. यावर अभिनेत्रीने दिलेलं उत्तर आणि शरद पवार यांच्यावर केलेली टिका याच्याशी संबंध जोडले जात आहे. केतकीच्या टॅटूने अनेक चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
गेल्या वर्षी तिने शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यामुळे केतकीला तुरुंगवासही सोसावा लागला होता. केतकीने नवीन वर्षाच्या दिवशी जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये तिने तिच्या हातावर 186/22 असा टॅटू गोंदला आहे. त्याचा काय अर्थ असा प्रश्न अनेक चाहत्यांनी विचारला होता. त्यावर केतकी म्हणाली की, “हा टॅटू म्हणजे माझा अंडरट्रायल कैदी नंबर आहे. ते अंक कैदी नंबरचे आहेत. मी कोणालाही माफ करु शकते. पण विसरु शकत नाही.”
शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे तिला तब्बल 41 दिवसांसाठी कारावासात राहावे लागले होते. याचं सत्य सांगत तिने चाहत्यांना टॅटूमागचं रहस्य सांगितल आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
२०२२ सालाला निरोप देताना अभिनेत्री हेमांगी कवीने शेअर केली सालाचा मागोवा घेणारी पोस्ट
मृणाल ठाकूरच्या नवीन दाक्षिणात्य चित्रपटाची घोषणा, नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांसमोर