Friday, March 29, 2024

२०२२ सालाला निरोप देताना अभिनेत्री हेमांगी कवीने शेअर केली सालाचा मागोवा घेणारी पोस्ट

नुकतेच आपण सर्वानी नवीन वर्षाचे अगदी दणक्यात स्वागत केले. कलाकारांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांमध्येच या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठा उत्साह दिसून आला. २०२२ हे वर्ष मनोरंजनविश्वासाठी संमिश्र राहिले. २०२२ ला निरोप देताना आणि २०२३ चे स्वागत करताना अनेक कलाकारांनी २०२२ या वर्षाचा मागोवा घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. यामध्ये मराठी आणि हिंदीमध्ये काम करणारी अभिनेत्री हेमांगी कवीचा देखील समावेश होता. हेमांगीने देखील २०२२ या वर्षात काय काय काम केले याबद्दल एक पोस्ट शेअर केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हेमांगी ही मराठी इंडस्ट्रीमधील एक अष्टपैलू अभिनेत्री आहे. ती सर्वच प्रकारच्या भूमिका अगदी लीलया पेलते. हेमांगी सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत मीडियामध्ये चर्चेत असते. एक बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री असलेल्या हेमांगीने नुकतीच २०२२ मधील तिच्या कामाची माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली ज्यात ती लिहिते, “Recap 2022
मागच्या वर्षातला कामाचा आढावा घेतला तर २०२२ ची सुरूवातच कलर्स मराठीच्या ’लेक माझी दुर्गा’ या मालिकेने झाली.
जुलै १५ ला ‘तमाशा Live’ प्रदर्शित झाला.
‘तिचं शहर होणं’ चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय पातळींवर screening झालं. Awards मिळाली. या वर्षी लवकरच हा चित्रपट प्रर्दशित होईल.
भारत माझा देश आहे आणि वऱ्हाडी वाजंत्री सारखे चित्रपट प्रर्दशित झाले.
पाचव्यांदा USA वारी झाली!
मुंबईच्या ताज मध्ये वाढदिवसानिमीत्त चहा पिण्याचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं! (हो, माझ्यासाठी ती achievement च आहे!
वरूण नार्वेकर या माझ्या आवडत्या दिग्दर्शकाबरोबर एका वेबसीरिजनिमित्त काम करायला मिळालं.
रवी जाधवांच्या ‘ताली’ या आणखी एका वेबसीरिजमध्ये माझ्या प्रेरणास्थानी असलेल्या सुश्मिता सेन सोबत स्क्रीन शेअर करायची संधी मला मिळाली!
भाडिपा या अत्यंत मेहनती समुहा सोबत एका महत्वाच्या विषयावर YouTube साठी Docufilm केली.
दोन जाहिराती केल्या. योग्य वेळी याबद्दल सविस्तर सांगेनच.
आणि वर्ष संपता संपता ‘Thanks Dear’ सारखं अप्रतिम असं नाटक माझ्या वाट्याला आलं!
या सगळ्यात शारिरीक स्वास्थ्याकडे बारीक दुर्लक्ष झालं. तमाशा Live च्या अपयशामुळे थोडी निराशा झाली पण इतर वेगवेगळ्या projects मुळे ती नाहीशी झाली.
पण या सगळ्यात महत्वाचं मनाचं आरोग्य ते intact राहीलं! Social Media चं trolling मनावर घेतलं नाही. वाकड्या बोलण्याला जमेल तितकी सरळ उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. प्रर्दशित झालेल्या चित्रपटांच्या Box office status ने हिरमोड जरूर झाला पण खचून गेले नाही. चित्रपटाला व्यवसायिक यश नाही मिळालं तरी माझ्या कामाचं कौतुक झालं! काम करताना मौज आली पाहीजे हेच मनात होतं!
आज नविन वर्ष सुरू होतंय. मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी जे काम येईल त्याला १०० % न्याय द्यायचं ठरवलंय!
तुमचं प्रेम, आशीर्वाद, लोभ असाच राहावा ही विनंती आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हॅप्पी न्यू इअर!”

या पोस्टसोबत तिने तिच्या प्रोजेक्ट्सचे फोटो देखील शेअर केले आहेत. हेमांगी नाटक, मालिका, चित्रपट आणि नृत्य अशा सर्वच ठिकाणी लोकप्रिय आहे. तिच्या पोस्ट तिला नेहमीच लाइमलाईट देणाऱ्या ठरतात. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत लवकरच नवीन प्रोजेकट आणण्याची विनंती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कडक! शिवानी बावकरचे फोटो पाहून लागिर झालं जी
रश्मी देसाईचा हटके लूक! चाहत्यांना पाडतोय भुरळ, पाहा फोटो गॅलरी

 

 

हे देखील वाचा