मागील काही दिवसांपासून अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच गाजताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवारांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकी अडचणीत सापडली आहे. केतकीच्या अडचणी कमी न होता अधिकच वाढल्याच्या दिसत आहे. आज केतकीची पोलीस कोठडीतील मुदत संपल्यामुळे तिला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तिला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे. आज केतकीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसला. केतकीच्या नावावर एका फेसबुक पोस्टनंतर १० ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले आहे.
केतकीला आज सुनावल्या न्यायालयीन कोठडीनंतर गोरेगाव पोलिसांकडून तिचा ताबा घेतला जाणार आहे. या दरम्यान, केतकी चितळेने जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ कडून केतकीची कसून चौकशी करण्यात आली. तिच्या घरी जाऊन तिचा लॅपटॉप आणि मोबाईल देखील ताब्यात घेतले आहे. याची सायबर सेलकडून तपासणी करण्यात येणार असून त्याचा अहवाल ठाणे गुन्हे शाखेला दिला जाईल. केतकीने आधी कोणताही वकील न घेता स्वतःची बाजू स्वतःचा कोर्टात मंडळी होती. मात्र आता केतकीने वकील घेतला असून, घनश्याम उपाध्याय केतकीचे वकील म्हणून कोर्टात तिची बाजू सादर करतील दरम्यान त्यांनीच तिचा जामिनासाठीचा अर्ज कोर्टात दाखल केला आहे.
केतकीने सोशल मीडियावर केलेल्या शरद पवार यांच्या विरोधातील पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी तिच्या विरोधात आंदोलन हात असून, तक्रारी दाखल होत आहे. केतकीवर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी केली जात असून, केतकीच्या पोस्ट विरोधात सर्वच राजकीय नेत्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा