Thursday, April 17, 2025
Home मराठी केतकी चितळेने घेतली हायकोर्टात धाव, सर्व गुन्हे आणि अटक बेकायदेशीर असल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी

केतकी चितळेने घेतली हायकोर्टात धाव, सर्व गुन्हे आणि अटक बेकायदेशीर असल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketaki Chitale) वाद राज्यात चांगलाच चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या पोस्टमुळे तिच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून केतकी चितळे अटकेत आहे. ७ जून रोजी यावर सुनावणी झाली ज्यामध्ये पुन्हा एकदा केतकीचा जेलमधील मुक्काम वाढल्याचे दिसत आहे. न्यायालयाने ९ दिवसांनी तिची पोलिस कोठडी वाढवल्याचे सांगत यावर १६ जून रोजी सुनावणी होणर असल्याचे स्पष्ट केले आहे.यावर केतकी चितळेने आक्षेप घेत हे सर्व गुन्हे बेकायदेशीर असल्याचे म्हणले आहे. 

अभिनेत्री केतकी चितळेने तिच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये केतकीने तिची बाजू मांडताना अनेक पोलिस ठाण्यांमध्ये तिच्यावर झालेली कारवाई बेकायदेशीर आहेत तसेच अटकेची कारवाईही बेकायदेशीर असून व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग झाल्याबद्दल नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली आहे. आपल्या वकिलामार्फत तिने हे निवेदन मुंबई हायकोर्टात सादर केले आहे.

केतकीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातही केंद्रिय अन्वेषण विभागाच्या न्यायालयात  याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये तिने अनिल देशमुख यांना जामीन देण्यात येऊ नये, जामीन दिला तर ते फरार होतील असे म्हणले आहे त्याचबरोबर केतकी प्रकरणाची केस सीबीआयकडे देण्याचीही मागणी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे करण्यात आहे. दरम्यान केतकी चितळेने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. केतकीच्या एका फेसबुक पोस्टमुळे हा वाद सुरू झाला होता. ज्यामुळे केतकीवर चौफेर टिका झाली होती. आता केतकीच्या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा