Tuesday, May 28, 2024

‘एकवीस वर्षाच्या आठवणी शब्दात कशा लिहू?’ भावाच्या मृत्यूने दुःखी झालेल्या केतकीची ह्रदयीस्पर्शी पोस्ट होतेय व्हायरल

लोकप्रिय मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या (Ketaki Mategaonkar) चुलत भावाने आत्महत्या केल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या बातमीने सर्वांनाच धक्का दिला होता. केतकीचा चुलत भाऊ अक्षय माटेगावकरने (Akshay Mategaonkar) पुण्यातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या अक्षयने इंटर्नशीप प्रोग्रामध्ये आलेल्या अपयशानंतर हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. अक्षयच्या मृत्यूनंतर अभिनेत्री केतकी माटेगावकरची भावूक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 

केतकी माटेगावकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलिकडेच केतकीच्या चुलत भावाच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. भावाच्या मृत्यूने दुःखी झालेल्या केतकीची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने अक्षयच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

केतकी माटेगावकरने ही पोस्ट आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केली आहे ज्यामध्ये तिने “माझा अक्षु, माझा छोटासा गोड अक्षु, तुझ्या सारखा अत्यंत सुस्वभावी, समजुतदार, मल्टिटॅलेंटेंड, प्रचंड हुशार भाऊ मला मिळाला. आता काय लिहू, की नको लिहू, २१ वर्षाच्या आठवणी शब्दात कशा लिहू? हाच विचार करतेय. किती आठवणी आहेत. अभ्यास झाला की सगळं बाजूला ठेवून रियाजाला बसुन हरवून जाणारा अक्शु, गझल ठुमकी ऐकत बसणारा, कधी हरिहरण तर कधी पिंक प्लॉड ऐकणारा, फूटबॉलमधला माहिती असणारा,घरी आली की जेमिंग करणारा माझा अक्शु मला सोडून गेला,” असे म्हणत भावूक झालेली दिसत आहे.

 

 

पोस्टमध्ये पुढे केतकी लिहते की, “आयुष्यात कोणतीही गोष्ट, ध्येय, स्वप्न, विचार आपल्यापेक्षा मोठे नसतात. ते होऊ द्यायचे नसतात. आपण आहोत म्हणूनच त्यांच अस्तित्व असते. तु आम्हाला सोडून गेलास पण, तुझ अप्रतिम गाणे तु सोबत असल्याची कायम जाणीव देत राहील. तुझं घरी आल की स्माईल करत मिठीत घेणे, कधीही मॅच चालू असली की तुझ्या मांडीवर डोक ठेवताच तुझे प्रेमाने डोक्यावरुन हाथ फिरवणे मिस करतेय मी. तु असशील तिथे, गात अशील, आनंदी अशील अशीच कल्पना करतेय मी, मिस यू अक्शु, तुझी केतकी ताई.” अभिनेत्री केतकी माटेगावकरची ही ह्रदयस्पर्शी पोस्ट सध्या व्हायरल होत असून चाहत्यांनीही त्यावर भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा –

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या ब्रेकअपवर वडील जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया चर्चेत

चाहत्यांना मोठा धक्का, ‘या’ कारणामुळे बंद होणार दाक्षिणात्य चित्रपटांची शूटिंग

‘या’ आजाराने त्रस्त आहे संभावना सेठ, व्हिडिओ शेअर करून दिली माहिती

 

 

हे देखील वाचा