Thursday, March 28, 2024

‘या’ आजाराने त्रस्त आहे संभावना सेठ, व्हिडिओ शेअर करून दिली माहिती

मनोरंजन जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री संभावना सेठ (sambhavna sheth) तिच्या टॅलेंटसाठी ओळखली जाते. संभावना लोकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. आजकाल अभिनेत्री चित्रपटाच्या पडद्यापासून दूर असली तरी ती व्लॉगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. काही दिवसांपूर्वी संभावनाला तिच्या वाढत्या वजनामुळे अनेकांनी ट्रोल केले होते. अशा परिस्थितीत आता स्वत: संभावनाने तिच्या वाढत्या वजनाचे खरे कारण तिच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे. सध्या ती एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. एक व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने तिची व्यथा मांडली आहे.

संभावना सेठने तिच्या अलीकडील व्लॉगमध्ये सांगितले की, ती सध्या संधिवात या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. आपल्या आजाराबद्दल बोलताना संभावना खूपच भावूक होते. या व्हिडिओमध्ये पुढे बोलताना, संभावनाने तिची आयव्हीएफ प्रक्रिया तीनदा अयशस्वी झाल्याचेही सांगितले. यामुळे तिचा सांधेदुखी जवळपास वर्षभरानंतर परत आला आहे. या व्हिडिओमध्ये संभावना स्पष्टपणे सांगताना दिसत आहे की, पती अविनाशलाही तिच्या आजारपणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. संभावना सेठने खुलासा केला की, या आजारामुळे तिला हालचाल करणे कठीण होत आहे. तिच्या हात-पायांमध्ये नेहमी सूज, वेदना आणि जडपणा असतो.

संभावना सेठने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक भोजपुरी (bhojpuri) चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. भोजपुरी चित्रपटांनी आपला ठसा उमटवल्यानंतर संभावना सेठ टीव्हीच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये दिसली होती. यापूर्वी, बिग बॉस ओटीटी २ साठी निर्मात्यांनी भोजपुरी इंडस्ट्रीतील संभावना सेठशी संपर्क साधला होता अशा बातम्याही आल्या होत्या. अभिनेत्री या शोचा भाग असेल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

डिमांड तर बघा! रकुल प्रीत सिंगला करायचे आहे रोमँटिक सिनेमात काम, शाहरुख खानला मानते आदर्श

बाबो! अनन्या पांडेला आवडतो ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता म्हणाली, ‘तु खुप सेक्सी आहेस, पण’

जेव्हा अभिनेत्री बिपाशा बसुच्या प्रेमात आकंठ बुडाला होता आर.माधवन, स्वतःच दिली होती प्रेमाची कबुली

हे देखील वाचा