Wednesday, July 2, 2025
Home मराठी ‘प्राजु’च्या सुंदरतेने पाडली नेटकऱ्यांना भुरळ! किल्लर लूकला मिळतेय भरभरून पसंती

‘प्राजु’च्या सुंदरतेने पाडली नेटकऱ्यांना भुरळ! किल्लर लूकला मिळतेय भरभरून पसंती

अभिनेत्री केतकी माटेगावकरने तिच्या गोंडस स्मित आणि उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना चकित करून सोडले. ‘टाईमपास’ मधली तिची ‘प्राजक्ता’ची भूमिका प्रचंड गाजली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर ती ‘प्राजू’ म्हणूनच ओळखली जायची. चित्रपटातील साधी प्राजू खऱ्या आयुष्यात तितकीच ग्लॅमरस आहे. हे आपण तिच्या फोटो व्हिडिओद्वारे सहज पाहू शकतो. अभिनेत्रीच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली की तुमच्याही लक्षात येईल की, ती किती स्टायलिश आहे.

नुकताच केतकीने शेअर केलेला एक फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा एक तिने इंस्टाग्रामवर शेअर केला, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. नेहमीप्रमाणे या फोटोमध्ये केतकीचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये ती भिंतीच्या कडेला थांबून फोटोसाठी पोझ देत आहे.

या फोटोखाली तिने तपकिरी रंगाचे हार्ट बनवले आहेत. केतकीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते यावर हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करून तिचं कौतुक करत आहेत. तसेच यावर आतापर्यंत ३७ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

केतकीने २०१२ साली ‘शाळा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिने बऱ्याच मराठी चित्रपटात भूमिका साकारून आपले नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटांच्या यादीत ‘आरोही’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘फुंतरू’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’

-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी

हे देखील वाचा