मराठी सिनेसृष्टीतून एक हैराण करणारी बातमी समोर येत आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या बातम्यांनुसार, मराठमोळी अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिच्या चुलत भावाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव अक्षय अमोल माटेगावकर आहे. तसेच, मिळालेल्या चिट्ठीनुसार, नोकरी न मिळण्याच्या भीतीने अक्षयने आत्महत्या केली आहे. त्याने हा भीतीला कंटाळून थेट इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत आपला जीव दिला.
अक्षयने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी…
अक्षयबद्दल बोलायचं झालं, तर तो सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिकत होता. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्याने सांगितयृलंय की, त्याने एका आयटी कंपनीत इंटर्नशिप केली होती. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्जही केले होते. मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती. या भीतीमुळे त्याने आत्महत्या केली आहे. (actress and singer ketaki mategaonkar cousin brother commits suicide)
अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, तर वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीत काम करतात. या घटनेनंतर माटेगावकर कुंटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात अभिनेत्री केतकीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा