‘टाइमपास’ चित्रपटातून पदार्पण करुन घराघरात लोकप्रिय झालेली केतकी माटेगावकर (ketaki mategaonkar) तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी सगळीकडेच प्रसिद्ध आहे. आपल्या अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय आणि गायनासोबतच आता केतकी माटेगावकरने संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. याआधी केतकीच्या माई अल्बमधील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता याच अल्बमधील दुसरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्याला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
आपल्या अभिनयाने सर्वांचीच मने जिंकणारी अभिनेत्री केतकी माटेगावकरने सध्या संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. केतकीने माई या तिच्या संगीत अल्बमधील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित केले आहे. नृसिंह सरस्वती यांच्यावरील हा ‘तुजविणं आता नसे कोणी त्राता ‘ हा अभंग यामध्ये पाहायला मिळत आहे. या गाण्याचे लेखन जगन्नाथ माटेगांवकर यांनी केले असून हे गाणे पंडित रघुनंदन पणशीकरांनी गायले आहे. या मधुर अभंगाला केतकी माटेगांवकरच संगीत लाभलेलं आहे. गायक पंडीत पणशीकरांच्या आवाजातील हे गाणे आणि जगन्नाथ माटेगावकरांच्या लेखनीतून आलेल्या या सुंदर ओळी सहज मनाला भिडत आहेत.
हा सुंदर अभंग केतकीने मॅजिक मिस्ट इंडिया या युट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे. केतकीची आई सुवर्णा माटेगावकर एक प्रसिद्ध गायिका आहेत. त्यामुळे केतकीला बालपणापासूनच गायनाचे बाळकडू मिळाले आहेत. लहानपणापासूनच गायनाची आवड असलेल्या केतकीने पंडित रघुनंदन पणशीकर यांच्याकडून गायनाचे धडे गिरवले आहेत.
हेही वाचा-
आईसोबत बाजारात भाजी आणायला गेला संकर्षण कऱ्हाडे, भन्नाट कॅप्शनसह फोटो होतोय व्हायरल