Friday, October 17, 2025
Home हॉलीवूड केविन स्पेसीचा अडचणी वाढल्या, यूके कोर्टाने अभिनेत्यावर लैंगिक छळाचे आरोप केले निश्चित

केविन स्पेसीचा अडचणी वाढल्या, यूके कोर्टाने अभिनेत्यावर लैंगिक छळाचे आरोप केले निश्चित

अभिनेता केविन स्पेसीला (Kevin Spacey) तीन पुरुषांवर लैंगिक अत्याचाराच्या चार गुन्ह्यांचा सामना करावा लागत आहे. ब्रिटनच्या क्राउन प्रोसिक्युशन सर्व्हिसने (CPS) ही माहिती दिली आहे. सीपीएसने सांगितले की, ६२ वर्षीय अभिनेत्यावर संमतीशिवाय लैंगिक कृत्य केल्याबद्दल आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मार्च २००५ ते ऑगस्ट २००८ दरम्यान लंडनमध्ये आणि एप्रिल २०१३ मध्ये ग्लुसेस्टरशायरमध्ये कथित घटना घडल्या. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी मागील तपासात गोळा केलेल्या पुराव्यांची उजळणी केल्यानंतर, अभिनेत्यावर हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

CPS स्पेशल क्राइम डिपार्टमेंटच्या प्रमुख रोझमेरी ऐन्सली यांनी सांगितले की, “केविन स्पेसीवर तीन पुरुषांवर लैंगिक अत्याचाराच्या चार गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय विनापरवाना एका व्यक्तीला लैंगिक कृत्यात सहभागी करल्याचा आरोपही निश्चित करण्यात आला आहे.” (kevin spacey is in trouble crown prosecution service)

स्पेसी हा दोन वेळा ऑस्कर विजेता आहे. त्याने १९९६ मध्ये द यूझुअल सस्पेक्टसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि २००० मध्ये अमेरिकन ब्युटीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. नेटफ्लिक्सच्या ‘हाऊस ऑफ कार्ड्स’, ‘सेव्हन’, ‘एलए कॉन्फिडेन्शियल’ आणि ‘बेबी ड्रायव्हर’मधील भूमिकांसाठीही तो ओळखला जातो.

तो २००४ ते २०१५ दरम्यान लंडनमधील ओल्ड विक थिएटरचा कला दिग्दर्शक होता. अभिनेता कॅलिफोर्नियामध्ये मोठा झाला, परंतु एका दशकाहून अधिक काळ राजधानीत राहिला. त्यानंतर तो लंडनमध्ये स्थायिक झाला. ऑक्टोबर २९१७ मध्ये MeToo चळवळीनंतर, त्याच्यावर पहिल्यांदा लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता.

हे आरोप समोर आल्यानंतर, ‘हाऊस ऑफ कार्ड्स’मधील राजकारणी फ्रान्सिस अंडरवुडच्या भूमिकेतून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. रिडले स्कॉटच्या ‘ऑल द मनी इन द वर्ल्ड’ या चित्रपटातील ऑइल टायकून जे पॉल गेटीची भूमिकाही त्याने गमावली. यानंतर स्पेसी सार्वजनिक ठिकाणी दिसायचा बंद झाला. गेल्या वर्षी तो इटालियन क्राईम ड्रामामध्ये गुप्तहेराच्या छोट्या भूमिकेत दिसला होता.

अलीकडेच, त्याच्या ‘पीटर फाइव्ह एट’ या नवीन चित्रपटाचा ट्रेलर कान्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्पेसीने खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्यावरील गैरवर्तनाचे आरोप समोर आल्यानंतर, त्याची ही पहिलीच प्रमुख भूमिका असेल. मात्र, स्पेसीने यापूर्वी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा