Sunday, May 19, 2024

The Grey Man | धनुषच्या हॉलिवूड चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीझ, चाहते पुन्हा पडले अभिनेत्याच्या प्रेमात

दाक्षिणात्य अभिनेता धनुष (Danush) लवकरच येणार्‍या ‘द ग्रे मॅन’ चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्याच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. या आगामी चित्रपटातून हॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या धनुषचा लूक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान, आता चाहत्यांची प्रतीक्षा थोडी कमी करत, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘द ग्रे मॅन’चा ट्रेलर रिलीझ केला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रायन गोसलिंग, ख्रिस इव्हान्स, ऍना डी अरमास यांच्यासह सर्व कलाकार जबरदस्त ऍक्शन करताना दिसत आहेत. त्याचवेळी साऊथचा अभिनेता धनुषही ऍक्शनमध्ये दिसला. अभिनेत्याची ही शैली त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. अभिनेत्याची दमदार अ‍ॅक्शन आणि उत्कृष्ट अभिनय पाहून, चाहते पुन्हा एकदा धनुषसाठी वेडे झाले आहेत. (the gray man trailer the powerful trailer of dhanush hollywood debut)

यूट्यूबवर शेअर केलेल्या चित्रपटाचा हा ट्रेलर अल्पावधीतच दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ट्रेलर पाहून लोक हा एक उत्तम ऍक्शन थ्रिलर चित्रपट असल्याचे सांगत आहेत. तसेच ट्रेलरमध्ये धनुषचा दमदार अभिनय पाहून तो त्याचे कौतुक करताना दिसत आहे.

‘द ग्रे मॅन’ हा अँथनी आणि जो रुसो दिग्दर्शित अमेरिकन ऍक्शन थ्रिलर असेल. या चित्रपटात रायन गॉसलिंग, ख्रिस इव्हान्स, ऍना डी आर्मास, रेगे-जीन पेज, जेसिका हेनविक, बिली बॉब थॉर्नटन आणि वॅगनर मौरा यांच्याही भूमिका आहेत. हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे, ज्याची कथा कोर्ट जेन्ट्री (रायन), एक फ्रीलान्स मारेकरी आणि माजी CIA ऑपरेटिव्ह यांच्याभोवती फिरते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा