साऊथ सुपरस्टार यश याचा सन २०२२मधील ‘केजीएफ २‘ हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमाने जगभरात १२०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. या सिनेमातील एका अभिनेत्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. सिनेमात ‘खासिम चाचा’ हे पात्र साकारणाऱ्या हरीश राय यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी मुलाखतीत सांगितले की, ते गळ्याच्या कर्करोगाचा सामना करत आहेत.
कन्नड सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते हरीश राय (Harish Rai) यांनी सांगितले की, ते ‘केजीएफ २’ (KGF 2) या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही या आजाराचा सामना करत होते. त्यांनी त्यांच्या गळ्याची सूज लपवण्यासाठी दाढी वाढवली होती.
सूज लपवण्यासाठी वाढवली दाढी
एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत हरीश राय यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल सांगितले. ते म्हणाले की, “कधीकधी परिस्थिती तुमच्यावर दयाळू असते आणि ती तुमच्यापासून गोष्टी काढूनही घेते. नशीब टाळता येत नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी कर्करोगाने त्रस्त आहे. केजीएफमध्ये काम करताना मी मोठी दाढी ठेवण्याचे एक कारण होते. या आजाराने माझा गळा सुजला आहे, त्यामुळे तो लपवावा लागला.”
Let's keep the fan war aside we will pray Harish Rai for a speedy recovery get well soon ChaCha #GetWellSoonHarishRai #VikrantRona #KGFChapter2 pic.twitter.com/d9sKetQsQL
— NAKUL CHAVAN (@NakulChavan13) August 26, 2022
कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात आहेत हरीश
‘केजीएफ २’ फेम अभिनेते हरीश यांनी सांगितले की, पैशांअभावी कर्करोगावरील शस्त्रक्रिया लांबणीवर पडली. मात्र, आता परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. हरीश म्हणाले की, “मी माझी शस्त्रक्रिया काही काळ पुढे ढकलली होती. कारण, माझ्याकडे आधी त्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. मी चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत होतो. आता मी आजाराच्या चौथ्या टप्प्यात पोहोचलो आहे आणि परिस्थिती खूप वाईट झाली आहे.”
कर्करोगाच्या उपचारासाठी महिन्याला येतो ३ लाख रुपये खर्च
हरीश यांनी एक व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. त्या व्हिडिओत त्यांनी इंडस्ट्रीतील लोकांना आणि त्यांच्या चाहत्यांकडे मदत मागितली होती. ते म्हणाले होते की, त्यांना कर्करोगाच्या उपचारादरम्यान त्यांची सर्व पैसे संपले आहे. असे सांगितले जाते की, त्यांच्या उपचारासाठी महिन्याला ३ लाख रुपये खर्च होतात. हरीश हे कन्नड सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी ‘बँगलोर अंडरवर्ल्ड’, ‘धन धना धन’ आणि ‘नन्ना कनासीना हूव’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मिनाक्षी राठोडने घातलं लेकीचं बारसं, खास स्टाईलमध्ये सांगितले मुलीचे नाव
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कलाकारांचा उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास, फोटो व्हायरल
इंजिनिअरिंग सोडून अभिनयात आली, अभिनेत्री सुचित्रा पल्लईचा सिनेसृष्टीचा प्रवास वाचून व्हाल थक्क