कोरोनाच्या साथीमुळे अनेक आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा सतत बदलल्या जात आहेत. कोरोना व्हायरसमुळे चित्रपटगृह बंद आहेत, शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनचे कामही बंद झाले आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांची रिलीझ डेट पुढे ढकलावी लागत आहे. त्याचप्रमाणे कन्नड स्टार यशच्या ‘केजीएफ २’ या चित्रपटाची रिलीझ डेटही बदलली गेली आहे. तसेच आता या चित्रपटाची नवीन रिलीझ डेट समोर आली आहे.
साल २०२१ च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असणाऱ्या ‘केजीएफ २’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी ‘केजीएफ २’ १६ जुलै रोजी रिलीझ होणार होता. परंतु कोरोनामुळे आता रिलीझची डेट ९ सप्टेंबर करण्यात आली आहे. चित्रपटाचे विश्लेषक सुमित कडेल यांनी ट्वीटमध्ये माहिती दिली की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे निर्माते प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत आहेत. आता हा चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीझ होण्याची शक्यता आहे. अशी अपेक्षा आहे की, तोपर्यंत कोरोनाची परिस्थिती सुधारेल आणि चित्रपटगृहे सुरू होतील.
#KGFChapter2 could’ve a theatrical release on 9th September providing covid is under control by then & theaters reopens across India. #KGF2 pic.twitter.com/3YpafwYoAy
— Sumit Kadel (@SumitkadeI) June 23, 2021
निर्मात्यांची इच्छा आहे की, हा चित्रपट तेव्हा रिलीझ व्हावा, जेव्हा मोठ्या संख्येने लोक थिएटरमध्ये येऊ शकतील. अशा परिस्थितीत आता ‘केजीएफ २’ च्या रिलीझची तारीख ९ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. चित्रपटाचे निर्माता प्रशांत नील यांनी अद्याप रिलीझबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
‘केजीएफ २’ चा ट्रेलर रिलीझ होऊन बराच काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा पहिला भागही प्रेक्षकांकडून खूप पसंत केला होता. हा चित्रपट पॅन इंडियाद्वारे एकूण ५ भाषांमध्ये रिलीझ होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष
-स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस










