Friday, February 13, 2026
Home साऊथ सिनेमा बाप रे! ‘केजीएफ’ फेम अभिनेत्याच्या कारला गंभीर अपघात

बाप रे! ‘केजीएफ’ फेम अभिनेत्याच्या कारला गंभीर अपघात

साऊथचा सुपरस्टार यशचा (Yash) लोकप्रिय चित्रपट ‘केजीएफ’ सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता बीएस अविनाश (BS Avinash) याचा कार अपघात झाला आहे. वृत्तानुसार, अविनाशचा अपघात बुधवारी (२९ जून) सकाळी बंगळुरूमध्ये झाला. अविनाश मर्सिडीज बेंझ चालवत होता आणि त्याच्या कारला ट्रकने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या अपघातात अविनाशला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

ट्रक चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
वृत्तानुसार, अविनाश ‘अनिल कुंबळे सर्कल’जवळ जात असताना एका ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, कब्बन पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी अविनाशच्या मदतीला धावून येऊन त्याला गाडीतून बाहेर काढले. रिपोर्ट्सनुसार, अविनाश सकाळी वर्कआउटसाठी जिममध्ये जात होता. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना या अपघाताची माहितीही दिली आहे. (kgf actor bs avinash meets with road accident)

केजीएफमध्ये ‘अँड्र्यू’च्या भूमिकेत दिसला होता अविनाश
अविनाशने यश-स्टारर ‘केजीएफ’मध्ये ‘अँड्र्यू’ची भूमिका साकारली होती. ‘केजीएफ’च्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागात त्याची भूमिका मोठी होती. दिवंगत अभिनेता चिरंजीवी सर्जा यांच्या पाठिंब्यामुळे अविनाशला केजीएफ मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. अविनाश सर्जा यांच्या मित्राच्या माध्यमातून चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर भुवन गौडा यांच्या संपर्कात आला. त्यानंतर त्यांनी अविनाशची प्रशांत नीलशी ओळख करून दिली.

‘केजीएफ’नंतर आल्या अनेक चित्रपटांच्या ऑफर
एका मुलाखतीत अविनाशने खुलासा केला होता की, त्याने २०१५ पासून ‘केजीएफ’ साठी ट्रेनिंग सुरू केले होते. ‘केजीएफ’चा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्याचेही त्याने सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा