Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड केजीएफ चॅप्टर २ मधील ‘अधिरा’ भूमिका संजयला मिळाली कशी? खुद्द त्यानेच केला खुलासा

केजीएफ चॅप्टर २ मधील ‘अधिरा’ भूमिका संजयला मिळाली कशी? खुद्द त्यानेच केला खुलासा

बॉलिवूडमधील अतिशय हँडसम अभिनेता म्हणून संजय दत्त ओळखला जातो. संजय जेवढा त्याच्या प्रभावी अभिनयासाठी ओळखला जातो, तेवढ्याच त्याच्या विविध भूमिकांसाठी देखील ओळखला जातो. संजय आणि वाद हे खूपच जुने समीकरण आहे. संजयने अनेक वाद पाहिले, अनेक चुका केल्या त्याच्या शिक्षा देखील भोगल्या. मात्र संजय तो संजय आहे. त्याचा अंदाज, त्याचे व्यक्तिमत्व नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घातले. त्याने कधीच एका चौकटीत राहून अभिनय केला नाही. तो सतत वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आला आणि त्याच्यात असणाऱ्या दमदार अभिनेत्याचे दर्शन सर्वाना दिले. आता लवकरच तो “केजीएफ चॅप्टर २” मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘केजीएफ चॅप्टर २’मध्ये संजय खलनायकाची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा २०१८ साली आलेल्या ‘केजीएफ’ सिनेमाचा पुढचा भाग आहे. या सिनेमात अक्षय ‘अधिरा’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमातील भूमिकेबाबत बोलताना संजय म्हणाला, “एक दिवस मला एक फोन आला की, मला केजीएफचे मेकर्स सिनेमामध्ये घेऊन इच्छिता. मी त्यांना विचारले की, ते मलाच का या सिनेमात घेऊ इच्छित आहे. त्यावर ते म्हणाले की, मेकर्स फक्त तुम्हालाच या भूमिकेत पाहू शकतात. खरे पाहिले तर ही भूमिका एक असाधारण असे चरित्रच आहे. एक चरित्र म्हणून ‘अधिरा’ खूपच मजबूत आहे. यासाठी मला ही भूमिका खूपच आवडली आणि मी त्याला होकार दिला.”

संजय पुढे म्हणाला की, “केजीएफ २ साठी मला विचारले गेले हा माझ्यासाठी साऊथ इंडस्ट्रीमधून आलेला पहिलाच प्रस्ताव होता. ही भूमिका ऋतिक रोशन आणि माझ्या ‘अग्निपथ’ सिनेमातील केस नसलेल्या कांचाचीना पेक्षा खूपच वेगळी आहे. कांचाचीना इतकीच ही भूमिका देखील मजबूत आणि मोठी आहे.” केजीएफ चॅप्टर २ हा सिनेमा येत्या १४ एप्रिलला कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

संजयने सांगितले की त्याच्या सिनेमातील भूमिका त्याच्यासाठी लार्जर देन लाईफ होत्या. ती म्हणाला, “एका अभिनेत्याच्या आयुष्यात लार्जर देन लाईफ भूमिका निभावणे खूपच आवश्यक असते. कारण लोकांना अशा भूमिका खूपच आवडतात. मी माझ्या ४० वर्षाच्या मोठ्या करिअरमध्ये मी हेच शिकलो. म्हणूनच मी अशा भूमिका करताना प्राधान्य देतो.”

संजय दत्तने त्याच्या करिअरची सुरुवात १९८१ साली आलेल्या ‘रॉकी’ सिनेमातून केली. त्यानंतर तो ‘विधाता’, ‘ईमानदार’, ‘जीते हैं शान से’, ‘इलक’, ‘ताकतवार’, ‘थानेदार’ मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ सिनेमातून या सिनेमात त्याने साकारलेली ‘बल्लू’ ही भूमिका खूप गाजली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा