दाक्षिणात्य अभिनेता यश (Yash) याला ‘केजीएफ’ या चित्रपटामुळे बरीच प्रसिद्धी मिळाली. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आणि चाहत्यांशी कनेक्ट राहतो. तो अनेकदा त्याच्या मुलांसोबतही व्हिडिओ शेअर करत असतो.
दाक्षिणात्य चित्रपट ‘केजीएफ’ (KGF) फेम यश (yash) रोजच चर्चेत असतो. तो आजकाल लोकप्रिय स्टार्सच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. तो एक अप्रतिम अभिनेता असून वैयक्तिक जीवनात एक चांगला पिता देखिल आहे. त्याची पत्नी राधिका पंडितही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज ती मुलांसोबत काही ना काही व्हिडिओ पोस्ट करत असते. पुन्हा त्याने एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा मुलगा त्याच्या वडिलांना वाईट म्हणत आहे. (kgf star yash son yatharv says papa is bad boy)
मुलगी आयरा आणि मुलगा यथर्व अशी यशला दोन अपत्य आहेत. दोघांमध्ये वर्षभराचा फरक आहे. तुम्ही मुलीचे व्हिडिओ पाहिले असतील, ज्यात ती तिच्या वडिलांच्या चित्रपटातील गाणी गातांना दिसली आहे. पण त्याचा मुलगा यथर्व यशला वाईट बाप म्हणत आहे. ज्याचा व्हिडिओ राधिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
राधिका पंडित ने केला व्हिडिओ शेअर
व्हिडिओमध्ये यश सतत यथर्वला सांगतो की ‘डॅडी एक गूड बॉय आहे’. पण तो त्याच्यावर रागावलेला दिसतो आणि आईजवळ बसलेला दिसतो. तो यश आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो. यश सतत त्याच्याकडून स्व:तचे कौतुक करून घेण्याचा प्रयत्न करत असला तरी तसे होत नाही. तो यशला ‘बॅड बॉय’ आणि मम्मीला ‘गुड गर्ल’ म्हणतो. १ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये तो यशला पुन्हा पुन्हा वाईट म्हणत आहे. व्हिडिओ शेअर करत राधिकाने लिहिले की, निकाल आला आहे.
खालील लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडिओ:
https://www.instagram.com/p/CgEquL5KRRB/?utm_source=ig_embed&ig_rid=9f285d0d-63f5-4070-8130-804b7915f6f7
डेटींगनंतर यशने केले लग्न
राधिका ही कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २००७ मध्ये एका टीव्ही शोच्या सेटवर यशसोबत तिची भेट झाली. या दोघांनीही दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर २०१६ साली लग्न केले. यानंतर त्यांना २०१८ मध्ये एक मुलगी आणि २०१९ मध्ये मुलगा झाला.
हेही वाचा