Friday, July 5, 2024

कुणाला टांगलं उलटं, तर कुणाच्या अंगावर सोडले कुत्रे; ‘खतरों के खिलाडी १२’मधील स्पर्धकांवर ‘अत्याचार’

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शोपैकी एक असलेला ‘खतरों के खिलाडी‘ हा शो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. या शोला मिळालेल्या लोकप्रियतेमुळेच या शोने आतापर्यंत १२व्या पर्वापर्यंत मजल मारली आहे. आता हे पर्व सुरू होऊन काही दिवस झाले आहेत. या शोचा टीआरपी सातत्याने वाढत असून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. स्टंटवर आधारित हा शो चाहत्यांना खूप आवडत आहे. ‘खतरों के खिलाडी’ हा असा रियॅलिटी शो आहे, ज्यामध्ये स्पर्धक संकटांचा सामना करताना दिसतात. त्यांना किडे-मुंग्या आणि साप-विंचवांमध्ये दिवस घालवावे लागतात. त्यामुळे चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन होते. मात्र, त्यांच्या आता अडचणीत वाढ होणार आहे.

‘खतरों के खिलाडी १२’ (Khatron Ke Khiladi 12) या शोचेही सूत्रसंचालन रोहित शेट्टी (Rohit Shetty) करत आहे. चाहते रोहितचे सूत्रसंचालन आणि स्पर्धकांसोबतच्या त्याच्या बाँडिंगला पसंती दर्शवतात. कलर्स चॅनेलने या एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सूत्रसंचालक रोहित शेट्टी अत्याचाराचा डोस वाढवण्याबाबत बोलत आहे. या प्रोमोमध्ये सर्व स्पर्धक पाण्यात उलटे लटकल्याचे दिसत आहेत. याला ‘अत्याचार आठवडा’ (Atyachaar Week) असे नाव दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

प्रोमो व्हिडिओ पाहून स्पष्टपणे म्हटले जाऊ शकते की, हा स्टंट प्रत्येकासाठी सोपा नसेल. रोहित म्हणतो की, “हा आठवडा आहे आपला ‘अत्याचार वीक.’ या पर्वात जे काही करायचं, ते नेक्स्ट लेव्हल करायचं. जो काही टॉर्चर असेल, तो नेक्स्ट लेव्हलचा असेल.” व्हिडिओत सर्वप्रथम स्पर्धकांना पाण्याच्या वर एका दोरीच्या साहाय्याने बांधून उलटे टांगले जाते. व्हिडिओत सर्व स्पर्धकांची स्थिती खूपच खराब होताना दिसत आहे.

यानंतर स्पर्धकांना खाण्यासाठी काही पदार्थ दिले जातात. हा किडे-मुंग्या खाण्याचा एपिसोडही असू शकतो. सोबतच काही स्पर्धकांच्या मागे जंगली कुत्र्यांनाही सोडल्याचे दिसत आहे.

‘खतरों के खिलाडी १२’ची शूटिंग दक्षिण आफ्रिकेच्या केफटाऊनमध्ये होत आहे. टीव्ही आणि ग्लॅमर जगतातील अनेक कलाकार या शोमध्ये खतरनाक स्टंट करताना दिसतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘बापासारखाच धमाकेदार स्टार बनेल’, धनुषच्या छोट्या मुलाचा ऍटिट्यूड पाहून चाहत्याची लक्षवेधी कमेंट

पुनीत राजकुमारच्या ट्विटर हँडलवरून हटवले ब्ल्यू टिक, सुशांत- सिद्धार्थच्या अकांऊटवर चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न

कोण आहे ‘ससुराल सिमर का’ फेम क्रिसन बॅरेटो? ‘अशी’ राहिलीय कारकीर्द

हे देखील वाचा