Thursday, March 28, 2024

पुनीत राजकुमारच्या ट्विटर हँडलवरून हटवले ब्ल्यू टिक, सुशांत- सिद्धार्थच्या अकांऊटवर चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न

दिवंगत दक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमारच्या (Puneeth Rajkumar) ट्विटर हँडलवरून ब्लू टिक हटवण्यात आले आहे. होय, ट्विटरने पुनीत राजकुमारचे ट्विटर अकाउंट अनवेरीफाइड केले आहे. या प्रकरणावर चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र आक्षेप व्यक्त केला असून, लवकरात लवकर अकाऊंट पुन्हा वेरीफाइड करण्याची मागणीही केली आहे. याशिवाय दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आणि सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांच्या ट्विटर अकाउंटच्या वेरीफाइडवरही चाहते प्रश्न विचारत आहेत. 

संतापले चाहते
पुनीत राजकुमारच्या ट्विटरवरून ब्लू टिक काढून टाकल्यानंतर, चाहत्यांकडून सातत्याने ब्लूटिक लवकरात लवकर रिस्टोअर करण्याची मागणी केली जात आहे. तर काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, सिद्धार्थ शुक्ला आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या ट्विटर हँडलवर ब्लूटिक असताना, पुनीत राजकुमारची ब्लू टिक का काढली? (puneeth rajkumars twitter handle gets unverified)

पुनीत राजकुमार हे कन्नड सिनेमातील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. मात्र दुर्दैवाने त्यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. पुनीत हे कर्नाटकमध्येच नाही तर संपूर्ण साऊथमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हृदयविकाराच्या धक्क्याने पुनीत यांचे मागच्या वर्षी निधन झाले. एका माहितीनुसार जिममध्ये मोठे वजन उचलल्यामुळे त्यांना ह्रदयविकाराचा धक्का आला आणि त्यांचे निधन झाले.

पुनीत राजकुमार यांचा ‘जेम्स’ (Puneeth Rajkumar Film James) हा सिनेमा १७ मार्चला त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी त्यांचे फॅन्स, कुटुंब सर्वच अतिशय भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पुनीत यांचा हा अखेरचा सिनेमा ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफ़ा प्रतिसाद दिला असून, सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. हा सिनेमा पुदित यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित केला गेला. ‘जेम्स’ हा पहिला कन्नड सिनेमा ठरला ज्याने १०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा