Monday, July 1, 2024

‘खतराे के खिलाडी’शाेची ऑफर धुडकावून ‘या’ अभिनेत्रीने केली माेठी चुक? चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

खतरों के खिलाडी 13‘ मुळे रोहित शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धोकादायक स्टंटवर आधारित रिअॅलिटी शोबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. ‘बिग बॉस 16‘ च्या आणखी एका लोकप्रिय स्पर्धकाने या शाेमध्ये  खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

प्रियांका चहर चौधरी (priyanka chahar choudhary) ‘बिग बॉस 16’ची सर्वात लोकप्रिय स्पर्धक होती. तिने अलीकडेच सांगितले की, तिला ‘खतरों के खिलाडी 13’ची ऑफर आली आहे. यावेळी प्रियांकाने असेही सांगितले की, ‘ती स्टंट करायला तयार आहे की, नाही हे तिने अजून ठरवलेले नाही.’ मात्र, अशात आता समोर येत असलेल्या बातम्यांनुसार प्रियांकाने ‘खतरों के खिलाडी 13’ ला नकार दिला आहे.

प्रियांकाने या शाेला नकार देण्यामागचे कारण सांगितले की, ‘तिला इतर मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत.’ अशात आता प्रियांका चहर चौधरीच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. लवकरच छाेट्या पडद्यावर आपल्या आपली आवडती अभिनेत्री दिसेल असे त्यांना वाटले हेते, पण आता तसे घडणार नाही.

‘खतरों के खिलाडी 13’ चे शूटिंग मे महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी शोचे शूटींग अर्जेंटिना येथे होणार आहे, जिथे दोन सीझनचे शूटिंग झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा शो 17 जुलैपर्यंत टीव्ही आणि ओटीटीवर प्रसारित केला जाईल. शिव ठाकरे, सौंदर्या शर्मा, मुनावर फारुकी, अर्चना गौतम, अंजली अरोरा या सेलिब्रिटींची नावे या शोचे निश्चित स्पर्धक म्हणून समोर आली आहेत.(khatron ke khiladi season 13 bigg boss 16 contestants priyanka chahar choudhary rejects rohit shetty show)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘प्रतिमेला शोभणारा नाही’ म्हणत जया बच्चन यांनी दिला होता अमिताभ बच्चन यांना KBC साठी नकार

जान्हवी कपूरचा ‘ताे’ बाेल्ड फाेटाे व्हायरल, बायफ्रेंड शिखर पहाडिया कमेंट करत म्हणाला…

हे देखील वाचा