Tuesday, June 25, 2024

‘खतरों के खिलाडी 13’मध्ये उर्फीची एन्ट्री झाली निश्चित? पण ‘बिग बाॅस16’च्या या स्पर्धकाने नाकारली ऑफर

उर्फी जावेद ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. ती तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. कपड्यांव्यतिरिक्त उर्फी जावेद तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. तिची फॅशन पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते, तर काहींना तिचा लूक प्रचंड आवडतो. अशात उर्फीबद्दल बातमी आहे की, ती लवकरच रोहित शेट्टीचा शो ‘खतरों के खिलाडी सीझन 13‘ मध्ये दिसणार आहे. या सीझनमध्ये ती तिच्या सौंदर्याची झलक दाखवताना दिसणार आहे.

उर्फी जाणार दक्षिण आफ्रिकेत?
उर्फी जावेद (urfi javed) शेवटची स्प्लिट्सविलामध्ये दिसली होती. या शोमध्ये तिने चांगलीच खळबळ उडवून दिली हाेती. अशात आता बातमी आहे की, उर्फी जावेद ‘खतरों के खिलाडी 13’ (khatron ke khiladi 13) मध्ये दिसणार आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, ‘खतरों के खिलाडी 13’ च्या निर्मात्यांनी अभिनेत्रीशी संपर्क साधला आहे. ज्यासाठी उर्फीने सहमती दर्शवली आहे. जर सर्व काही ठीक झाले, तर उर्फी लवकरच खतरों के खिलाडी सीझन 13 च्या शूटिंगसाठी रोहित शेट्टीसोबत दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

शालीन भानाेतने ठाेकारली ‘खतरों के खिलाडी 13’ची ऑफर?
फक्त उर्फी जावेदच नाही, तर ‘बिग बॉस सीझन 16’ चा स्पर्धक शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अर्चना गौतम (Archana Gautam) देखील 13व्या सीझनमध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय मुनावर फारुकी, सुंबुल तौकीर खान आणि नकुल मेहता यांचीही नावे समोर येत आहेत. रोहित शेट्टी ‘बिग बॉस 16’ च्या घरात दिसला होता. यादरम्यान त्याने स्पर्धकांकडून स्टंटही करुन घेतले, ज्यानंतर राेहीतने शालीन भानोतला ‘खतरों के खिलाडी 13’ची ऑफर दिली. मात्र, शालीनने त्याच्या फोबियाचे कारण सांगून ही ऑफर नाकारली. (tv actress urfi javed may appear in rohit shetty show khatron ke khiladi latest season )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांवर कडाडली कंगना; सोशल मिडियावर स्वत:चीच यादी केली शेअर

श्रीदेवी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चीनमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार त्यांचा ‘हा’ सुपरहिट सिनेमा

हे देखील वाचा