Friday, November 22, 2024
Home भोजपूरी भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादवच्या पत्नी, मुलीला बलात्काराची धमकी, ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ

भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादवच्या पत्नी, मुलीला बलात्काराची धमकी, ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ

भोजपुरी इंडस्ट्रीत अनेक नाट्यमय घटना सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी शिल्पी राजचा इंटिमेट व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पवन सिंगचा त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर आता एक नवीन प्रकरण समोर आले आहे. खेसारी लाल यादव  (Khesari lal yadav) सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहे. गौतम सिंग नावाच्या युट्युबरने खेसारी लालला धक्काबुक्की केली आहे. यूट्यूबरमुळे अस्वस्थ झालेल्या खेसारीने बिहार सरकारवर विश्वास ठेवून मदतीचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि बिहार पोलिसांकडून संरक्षणाची मागणी करत खेसारी लालने संबधितावर कठोर कारवाईची मागणीही केली आहे.

याबाबतची संपूर्ण माहिती अशी की, गौतम सिंग हा युट्यूबर आहे आणि तो मगहिया जवान नावाचा चॅनल चालवतो.काही दिवसांपूर्वी   गौतने लाइव्ह येऊन खेसारी लालची टॅटूवाली चाहती सौम्या पोखरेलला आणि खेसारीच्या कुटुंबाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. तोच व्हिडिओ शेअर करत खेसारी लालने त्याच्या ट्विटर हँडलवर ट्विट करत “या मानसिकदृष्ट्या विकृत आणि विषारी व्यक्तीवर कारवाई करा. केवळ शिवीगाळच नाही तर माझ्या पत्नी आणि मुलीवर बलात्काराची धमकीही दिली”अशी भाषेत आपला संताप व्यक्त केला आहे.

या ट्विटनंतर काही तासांनी खेसारी लालने बिहार पोलिसांसाठी आणखी एक ट्विट केले आहे ज्यामध्ये त्याने “माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काही चुकीचे झाले तर तुम्ही जबाबदार असाल. हा निर्लज्ज व्हिडिओ बनवून माझ्या कुटुंबाला धमकावले जात आहे. बिहारची कायदा आणि सुव्यवस्था गुंडांच्या हातात गहाण पडली आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण तेव्हा सुरू झाले जेव्हा सौम्याने एका मुलाखतीत पवन सिंगला ओळखण्यास नकार दिला. तेव्हापासून पवन सिंगचे चाहते खेसारी आणि सौम्या यांच्यावर नाराज आहेत. दुसरीकडे, ही बाब समोर येताच खेसारी लालने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन भोजपुरी प्रेक्षकांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की, जर कोणी लहान-मोठ्या कलाकाराला ओळखत नसेल, तर त्यात इतके वाईट समजण्यासारखं काही नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा