Friday, April 19, 2024

प्रेम करूया खुल्लम खुल्ला: रोमॅंटिक वातावरण नवऱ्यासोबत रोमान्स करताना दिसली सपना चौधरी

आपल्या एका पेक्षा एक हिट गाण्यांसाठी आणि शानदार डान्स मूव्हजसाठी हरयाणाची क्वीन सपना चौधरी ओळखली जाते. सपना तिच्या सोशल मीडिया मीडियावरील पोस्टमुळे देखील तुफान गाजताना दिसते. सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणाऱ्या सपनाचे नवनवीन व्हिडिओ सतत व्हायरल होताना दिसतात. फॅन फॉलोविंगमध्ये देखील सपना मोठमोठ्या कलाकारांना तगडी टक्कर देताना दिसते. सपनाचे फॅन्स देखील तिच्या पोस्टची आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहताना दिसतात.

सपना चौधरीने नुकताच तिच्या सोशल मीडियावर तिचा एक सुंदर आणि आकर्षक व्हिडिओ शेअर केला आहे. या नवीन व्हिडिओमध्ये सपना तिच्या नवऱ्यासोबत वीर साहूसोबत रोमान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये डोंगरांमध्ये सूर्यास्ताच्या वेळी सपना आणि तिचा नवरा घराच्या गच्चीवर रोमान्स करत आहे.

हा व्हिडिओ सपनाने इंस्टाग्रामवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “हृदयाची धडकन.” नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडिओवर सपनाचे फॅन्स तुफान लाईक्सचा वर्षाव करत असून, कमेंट्सचा भडीमार केला जात आहे. एका युजरने लिहिले, “परफेक्ट जोडी”, दुसऱ्याने लिहिले, “दोघे फक्त एकमेकांसाठीच”, तर एकाने लिहिले, “बेस्ट कपल”. फॅन्स या दोघांच्या जोडीचे तुफान कौतुक करताना दिसत आहे.

हे पहिल्यांदा नाही तर याआधी देखील सपनाने तिचे तिच्या नवऱ्यावरील प्रेम जगासमोर व्यक्त केले. तिने काही दिवसांपूर्वीच तिच्या नवऱ्याचे नाव हातावर कोरले आहे. याशिवाय सपना देखील तिच्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून फॅन्सला भेटत असते. बिग बॉस फेम सपनाला नेहमीच तिच्या गाण्यांसाठी आणि डान्ससाठी ओळख मिळते मात्र आता तिला आता रोमान्सची क्वीन म्हणून देखील ओळखले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा