Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी मॉलमध्येच केला तिने खेसारी लाल यादवच्या सुपरहिट गाण्यावर ‘धमाका’; पाहुन तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात!’

मॉलमध्येच केला तिने खेसारी लाल यादवच्या सुपरहिट गाण्यावर ‘धमाका’; पाहुन तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात!’

भोजपुरी गाण्यांमागे संपूर्ण तरुणाई वेडी झाली आहे. चाहत्यांमध्ये नेहमीच नवीन भोजपुरी गाणं पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचलेली असते. अशात आपल्या दमदार अभिनयाने तरुणाईला भुरळ पाडलेला अभिनेता म्हणजे खेसारी लाल यादव होय. या अभिनेत्याचे प्रत्येक गाणे हे हिट ठरते. प्रेक्षक त्याच्या सर्वच गाण्यांना चांगलंच डोक्यावर घेतात. गाण्यामध्ये वापरले जाणारे संगीत रसिक प्रेक्षकांना खूप आवडते. तसेच खेसारी लालच्या अभिनयाची, तर बातच और आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये अनेक नवीन गाणी नावारूपाला येतात. प्रेक्षकांना जुन्या गाण्याचा थोडा विसर पडतो आणि नवीन गाण्यांचे वेड सुरू होते. परंतु खेसारी लालची जुनी गाणी देखील चाहते आजही आवडीने पाहतात.

खेसारी लालचे ‘हम तुम्हारे हैं सनम’ हे गाणे प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतले होते. यूट्यूबवर हे गाणे ३१ मे २०२१ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते. त्याच्या या गाण्याने त्यावेळी प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली होती. विशेष म्हणजे अजून देखील या गाण्याची क्रेज संपलेली नाही. या गाण्यावर एक इंस्टाग्राम व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टार सूचीचा आहे. यामध्ये सूची या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्याप्रमाणेच तिचा डान्स देखील खूप सुंदर आहे. तिने हा व्हिडिओ एका शॉपिंग मॉलमध्ये शूट केल्याचे दिसत आहे. सूचीने यामध्ये लाल रंगाचा चौकटींचा एक टॉप आणि काळ्या रंगाचा मिनी स्कर्ट घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत असून, ‘हम तुम्हारे हैं सनम’ या गाण्याचा तिचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे. (Khesari Lal Yadav’s song ‘Hum Tumhare Hain Sanam’ girl explodes in shopping mall, watch video)

तिचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचाच आहे. परंतु खेसारी लालच्या गाण्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सूचीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक रील्सचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

अभिनेता खेसारी लाल यादवच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने साल २०११ मध्ये ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. तसेच तो ‘बिग बॉस १३’ मध्ये देखील सहभागी झाला होता. त्याच्या दमदार अभिनयामुळे त्याला आतापर्यंत तीन पुरस्कारांनी सन्मानित  करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

हे देखील वाचा