Friday, September 6, 2024
Home बॉलीवूड ख्लो कार्दशियनने खुशी कपूरचा फोटो शेअर केला, चाहत्यांनी केल्या मजेदार कमेंट्स

ख्लो कार्दशियनने खुशी कपूरचा फोटो शेअर केला, चाहत्यांनी केल्या मजेदार कमेंट्स

किम कार्दशियन आणि तिची बहीण क्लो कार्दशियन हे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नासाठी भारतात आल्या होत्या. दोन्हीही बहिणींनी सगळ्या फॅन्सचे लक्ष स्वतःकडे वळवलं होतं. त्यातच क्लो कार्दशियनने श्रीदेवी आणि बोनी कपूरची लहान मूलगी खूशी कपूरचा हिचा फोटो तिच्या सोशल मिडीया आकाउंटवर शेअर करून त्याखाली एक कॅप्शन लिहीले आहे.

क्लो कार्दशियन आणि किम कार्दशियन या अमेरिकन रिऑलीटी टीव्ही स्टार आहेत आणि बहिणी आहेत. क्लो कार्दशियन आणि किम कार्दशियन या दोघीही बहीणी आपल्या भारत दौऱ्याचे फोटोज् आपल्या सोशल मिडीया आकाउंटवर पोस्ट करत होत्या. त्यातच त्यांनी ख़ुशी कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. स्नॅपचॅट

क्लो कार्दशियन स्नॅपचॅटवर खूशी कपूरचा फोटो शेअर करून ” मला वाटतं हा माझ्या आवडत्या फोटोमधला एक फोटो आहे.”असे कॅप्शन तिने त्या फोटो खाली लिहीले आहे. या फोटोत खूशी कपूर एका सुंदर पांढऱ्या रंगाच्या लेहंग्यात दिसत आहे. त्यावर तिने केसांची पोनीटेल स्टाइल करून डायमंड चोकरसोबत आपला लूक पुर्ण केला आहे.

क्लो कार्दशियन हा टाकलेला फोटो बघून भारतीय हैराण झाले आहेत. एकाने तर मजेत कमेंट सुद्धा केली आहे,’ क्लोने खूशीला पहिल्या नजरेत केंडल जेनर समजलं असेल’.दूसऱ्या यूजरने लिहीले,’आग थांब ती कॅडल नाही आहे.’एका यूजरने लिहीलं,’खरं सांगू तर ती या पोशाकात खूप सुंदर दिसतेय.

क्लोने आपल्या विडीओ मध्ये स्पष्ट केलं आहे तिला भारतात वेळ खूप आवडला आहे.तिने एक पोस्ट शेअर केली त्यात तिने लिहीले की, “धन्यावाद भारत, हे एक स्वप्न खरं झाल्यासारखच आहे.काही दिवसांसाठी आपल्या संस्कृतीला आमच्यासोबत शेअर केल्यासाठी मी आणि माझी बहीण किम आभारी आहोत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पायल अरमानला देणार घटस्फोट! म्हणाली, ‘त्याने कृतिकासोबत राहावं, मी मुलांची काळजी घेईन’
श्वेता तिवारीसोबत डेटींगच्या अफवांवर फहमन म्हणतो, ‘आमचे नाते कसे आहे हे आम्हाला माहीत आहे’

हे देखील वाचा