Friday, July 5, 2024

‘खुदा हाफिज’ फेम अहाना कुमराने तिच्या बोल्ड बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग

बॉलिवूड अभिनेत्री सध्या सुट्टीचा आनंद लुटत आहेत. काही कलाकार आपल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीव आणि गोव्यासारख्या ठिकाणी गेले असून, सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करून चाहत्यांना पिकनिकची एक झलक दाखवत आहे. खासकरून बॉलिवूड अभिनेत्री ह्या आपला बोल्ड अंदाज सर्वांना दाखवत आहेत. अलीकडेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपला बिकिनीमधला फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये तिला ओळखने देखील अवघड झाले आहे.

या बिकिनीच्या फोटोमध्ये दुसरी कोणी नसून ती ‘खुदा हाफिज’ या चित्रपटामधली आहना कुमरा आहे. ‘खुदा हाफिज’ या चित्रपटात बुरख्यामध्ये दिसलेली अहाना तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. ती नेहमी सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. ती सतत स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

अलीकडेच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड बिकिनीमध्ये दिसत आहे. तिचा हे दोन्ही फोटो पाठमोरे काढण्यात आला असून, एका फोटोमध्ये तिचा चेहरा दिसत नाहीये, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती कॅमेऱ्याकडे वळून पोज देत आहे. या फोटोंचे वैशिष्ट्य म्हणजे ती जिथे आहे ते स्थान. अहाना अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असून, तिच्या मागे हिरवागार डोंगर दिसत आहे.

अहानाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत असून, तिचे चाहते देखील ह्या फोटोंना खूप पसंती दाखवत आहे. तिच्या या फोटोंवर एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, ‘खूप सुंदर’ तर दुसऱ्याने लिहिले ‘तुझ्या या बोल्ड अंदाजाने सोशल मीडियावर आग लावली आहेस’. अहाना अनेक चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये दिसत असते. तिने बॉलिवूडमध्ये ‘सोना स्पा’ या चित्रपटातून पदार्पण केले होते.

मात्र तिला ‘सोना स्पा’ या चित्रपटातून जास्त ओळख मिळाली नाही. तिने ‘लिप्सटिक अंडर माय बुर्का’, ‘बेताल’, ‘एजेंट राघव’, ‘बावरी छोरी’, ‘द एक्सिडेंटर प्राइम मिनिस्टर’, ‘फॉरबिडन लव’, ‘सँडविच फॉरेवर’ यासारख्या चित्रपटात आणि वेबसिरीजमध्ये तिने कामे केली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला

गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…

 

हे देखील वाचा