भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये नेहमीच एक दोन दिवसांनी वेगवेगळी गाणी प्रदर्शित होत असतात. मुख्य म्हणजे एवढे नवनवीन गाणे येऊनही प्रत्येक गाणे थोडे फार फरकाने ब्लॉकबस्टर ठरते. या गाण्याचे चाहते संपूर्ण भारतात असून, ते नेहमीच या गाण्यांची आतुरतेने वाट बघत असतात. या गाण्यांमध्ये रोमॅंटिक, पार्टी सॉंग, इमोशनल सॉंग आदी अनेक प्रकार असतात. मात्र मधल्या काही काळापासून इथे देखील रॅप गाण्यांची क्रेझ वाढत आहे.
यातच खुशबू तिवारीचे एक रॅप सॉंग तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर हजारो रील बनले असून, अजूनही अनेक रिल्स बनत आहे. तिच्या गाण्याचे नाव ‘पटा लोगे’ आहे. नावच एवढे हटके आहे की, आहे की एकटाच क्षणी नक्की गाणे काय असेल असा विचार डोक्यात येतो. या गाण्याला सध्या प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहे. या गाण्यावर सामान्य लोकांसोबतच बॉलिवूड आणि भोजपुरी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी रील व्हिडिओ बनवले आहे.
खुशबू तिवारीच्या या गाण्याला प्रदर्शित होऊन आता एक महिन्यापेक्षा जास्तीचा काळ झाला असला तरी गाण्याची लोकांमध्ये तुफान डिमांड आहे. हे गाणे सतत ट्रेंडिंगमध्ये टॉपवर असून, सर्वच गाण्यांच्या अपवर हे गाणे उपलब्ध आहे. शिवाय या गाण्याचा व्हिडिओ देखील यूटुबवर आहे. यामध्ये खुशबू तिवारी शुभम जैकरसोबत दिसत आहे. या गाण्याचे शब्द यादव राज यांनी लिहिले असून, गाण्याला संगीत विक्की वॉकने दिले आहे. खुशबू तिवारीच्या या गाण्याला आतापर्यंत 5 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी ऐकले आहे.
खुशबू तिवारीच्या हे गाणे तिच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल के टी एंटरटेनमेंटवर प्रदर्शित केले गेले असून, भोजपुरी सिनेमातील सर्वच मोठमोठ्या कलाकारांनी या गाण्याला प्रमोट केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शहनाज गिल असे काय म्हणाली की, दुसऱ्यांना हसवणाऱ्या कपिल शर्माला देखील हसणे झाले अनावर
‘आरआरआर’ने ऑस्कर जिंकल्याचा आनंदात भारतीच्या मुलाने केला जल्लाेश, व्हिडिओ व्हायरल