Monday, July 1, 2024

नादच खुळा! श्रीदेवीची लाडकी लेक बनलीय ‘लालपरी’, फोटोवर बहीण सोनमसह इतर मैत्रिणींच्या हटके कमेंट्स

स्टार किड्सच्या बाबतीत नेहमीच सामान्य लोकांना प्रचंड आकर्षण राहिले आहे. स्टार्स पेक्षाही सध्या स्टार्स किड्सची लोकप्रियता अधिक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अभिनयात येण्याआधीपासूनच या किड्सला तुफान फॅन फॉलोविंग आहे. शिवाय त्यांची लोकप्रियता आणि प्रसिद्धी मोठमोठ्या कलाकरांना देखील टक्कर देईल अशी आहे. या नवीन पिढीच्या कलाकारांमध्ये बहुतकरून स्टार किड्सची चलती बॉलिवूडमध्ये आहे. अनेक स्टार किड्स चित्रपटांमध्ये येण्यासाठी सज्ज झाले आहेत. यातलीच एक लोकप्रिय स्टार कीड म्हणजे खुशी कपूर.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि त्यांचे पती बोनी कपूर यांची लहान कन्या असलेली खुशी येणाऱ्या काही काळात आपल्याला चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसण्याची शक्यता आहे. मात्र, आतापासूनच खुशी सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे. खुशी नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतच असते. नुकताच खुशीने तिचा एक रेड वनपीस घातलेला फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती लालपरीप्रमाणे दिसत आहे. तिच्या या सुंदर फोटोंवर फॅन्स तर सोडाच, कलाकार देखील कमेंट्स करताना दिसत आहे.

खुशीची चुलत बहीण असलेल्या सोनम कपूरने ‘लव्ह इट’ लिहिले आहे. सोबतच अंशुला कपूर, शनाया कपूर, आलिया कश्यप, नव्या नवेली आदींनी देखील खुशीच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

खुशीने शेअर केलेल्या रेड ड्रेसमध्ये तिने कर्ली हेअर आणि न्यूड मेकअप केला असून रेड लिपस्टिक तिचा लूक पूर्ण करत आहे. खुशीने शेअर केलेल्या सर्वच फोटोंमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोवर अगदी कमी वेळात लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत.

याआधी देखील खुशीने तिचे बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय काही दिवसांपूर्वीच तिने तिचे बिकिनीतील फोटो देखील शेअर केले होते. लव्हेंडर कलरच्या बिकिनीत खुशी कमालीची हॉट दिसत होती. खुशी लावरच चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, कधी ते अजून समजले नाहीये.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

एका फोटोत केले चक्रासन, तर दुसऱ्यात पडलीय बेडवर; पाहा दीपिकाचे ‘एक्सपेक्टेशन वर्सेस रियॅलिटी’

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-दिशा वकानीचा सख्खा भाऊ आहे मयूर वकानी; ‘या’ कारणामुळे तिच्याप्रमाणेच तो देखील आहे शोमधून गायब

हे देखील वाचा