Wednesday, July 3, 2024

बोनी कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ख़ुशी कपूरने शेअर केला श्रीजी आणि बोनी यांचा सुंदर फोटो

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर गुरुवारी (११ नोव्हेंबर) त्यांचा ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्याचवेळी, त्यांची धाकटी मुलगी खुशी कपूरने तिच्या वडिलांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. खुशी कपूरने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत बोनी कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

खुशीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बोनी कपूर आणि आई श्री देवी यांचा फोटो शेअर करून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा पापा, तुम्हाला खूप प्रेम.” या फोटोमध्ये बोनी आणि श्रीदेवी रोमँटिक पोझ देताना दिसत असून, या फोटोवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. विशेष म्हणजे कपूर कुटुंबात जेव्हा जेव्हा आनंदाचा प्रसंग येतो तेव्हा प्रत्येकजण बोनी यांच्यासोबत श्रीदेवीचा फोटो नक्कीच पोस्ट करताना दिसतो. यानिमित्ताने सर्वांना श्रीदेवीची आठवण येते.

Photo Courtesy: Instagram/khushi05k

बोनी आणि श्रीदेवी यांनी १९९६ मध्ये लग्न केले होते. त्यानंतर काही महिन्यांतच जान्हवी कपूरचा जन्म झाला. विशेष म्हणजे श्रीदेवी ह्या लग्नाआधीच प्रेग्नेंट होत्या. श्रीदेवी आणि बोनी यांना जान्हवी आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असताना, खुशी कपूर चित्रपटांमध्ये काम करणार की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियावर खुशीचे भरपूर फोटो व्हायरल होत असतात. चित्रपटांमध्ये आली नसली तरी तिला चाहत्यांची कमतरता अजिबात नाहीये.

बोनी कपूर यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी आजपर्यंत एक निर्माता म्हणून अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आता लवकरच ते त्यांच्या अभिनयाचे कौशल्य दाखवणार आहे. लव रंजन यांच्या आगामी सिनेमात बोनी कपूर रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि डिंपल कपाडिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव

हे देखील वाचा