Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड ‘मला अजिबात घाई नाही..’ लग्नाबद्दल अभिनेत्री कियारा अडवाणीने केला मोठा खुलासा

‘मला अजिबात घाई नाही..’ लग्नाबद्दल अभिनेत्री कियारा अडवाणीने केला मोठा खुलासा

बॉलिवूडची अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani)  सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताच कियारा अडवाणीचा भुलभूलैय्या २ चित्रपट प्रदर्शित झाला  होता. या चित्रपटाने जबरदस्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्याचप्रमाणे आता अभिनेत्री कियारा अडवाणीचा जुग जुग जियो चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता कियारा अडवाणीच्या करिअरची गाडी सुसाट सुटलेली पाहायला मिळत आहे. मात्र कियाराच्या चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्याचीही चांगलीच उत्सुकता लागली आहे. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा त्यांच्या प्रेमप्रकरणाची कधी कबुली देणार, हाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असून याबद्दलचा खुलासा अलिकडेच कियाराने केला आहे. 

कियारा अडवाणी ही बॉलिवूड जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलिकडेच तिने आपल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कियाराने म्हटले आहे की, “सध्या तिच्यावर लग्नाबाबत कोणताही दबाव नाही. तसेच मला वाटत नाही की अविवाहित लोकांवर लग्नाचा दबाव आहे,”  त्याचवेळी या मुलाखतीत कियाराने अभिनेते अनिल कपूर यांच्याकडून मिळालेल्या एका सल्ल्याचाही उल्लेख केला आहे.

कियारा म्हणते की “अनिल कपूरने तिला सांगितले आहे की जेव्हा योग्य वेळ असेल आणि तुम्हाला स्वतःला असे वाटते की आता तुम्ही लग्नासाठी तयार आहात, तेव्हा तुम्ही लग्न करावे. वय, समाज आणि इतर गोष्टींचा विचार करून लग्न करू नका. तुम्ही स्वतः तयार असाल तेव्हाच लग्न करा आणि तोपर्यंत हिट चित्रपट देत राहा,” दरम्यान ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट २४ जूनला प्रदर्शित होत आहे. त्याचवेळी कियाराच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री राम चरण तेजासोबत आरसी 15 या चित्रपटात दिसणार आहे.

हे देखील वाचा