Friday, December 1, 2023

क्रेन क्रॅश अपघातात कशीबशी वाचली होती काजल अग्रवाल; तुमच्याही अंगावर काटा आणेल तो थरारक किस्सा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील असलेली आणि बॉलिवूड ‘सिंघम‘ फेम अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल होय. काजल नेहमीच तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. अशात आज काजल साेमवारी (19 जुन)ला तिचा 37 वाढदिवस साजरा करत आहे. चला, तर यानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्रीबाबत कधीही न उलगडलेल्या रंजक गोष्टी…

काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985मध्ये मुंबई येथे झाला होता. ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. मागील काही दिवसांपासून ती कमल हसन यांच्यासोबत ‘इंडियन 2’ या चित्रपटाची शूटिंग करत होती. तेव्हा तिथे एक मोठा अपघात झाला होता. हा अपघात एवढा मोठा होता की, यात तीन लोकांचा मृत्यू झाला होता आणि 9 लोक जखमी झाले होते. माध्यमातील वृत्तानुसार, ही घटना ईवीपी स्टुडिओमध्ये क्रेन क्रॅश झाल्याने घडली होती. तर काजल या घटनेतून कशी बशी वाचली होती. तिच्या मनावर आणि मेंदूवर या गोष्टीचा एवढा परिणाम झाला होता की, अनेक दिवस ती या घटनेतून बाहेर आलीच नव्हती. (Sauth actress Kajal Aggarwal’s birthday let’s know some unknown fact about her)

या घटनेबाबत सांगताना तिने ट्वीट देखील केले होते की, “काल रात्री त्या भयंकर क्रेन अपघातानंतर मी शुद्धीवर नव्हते. त्या अपघाततून जिवंत राहण्यासाठी केवळ 1 मिनिटाचा काळ लागला. मी त्या वेळेची आणि आयुष्याची खूप आभारी आहे.”

मागच्या वर्षी सिंगापूरमधील एका म्युझियममध्ये काजल अग्रवालचा एक पुतळा बनवला आहे. त्या पुतळ्याचे महत्व तिच्या दृष्टीने खूप आहे. ती साऊथमधील पहिली अभिनेत्री आहे जिचा पुतळा वॅक्स स्ट्यॅच्यु मॅडम तुसादमध्ये बनवला आहे. याआधी तिथे साऊथमधील कोणत्याच अभिनेत्रीचा पुतळा बनवला नाहीये. मागच्या वर्षी या पुतळ्याच्या उद्घाटनावेळी ती तिच्या परिवारासोबत गेली होती.

काजलने 2011मध्ये ‘सिंघम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या आधी तिने बॉलिवूडमध्ये ‘क्यू हो गया ना’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने ऐश्वर्या रायच्या छोट्या बहिणीचे पात्र निभावले होते. परंतु काही कारणांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. यानंतर तिने रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये जोरदार एंट्री केली. यामध्ये अजय देवगण आणि काजल मुख्य भूमिकेत होते. यानंतर तिने ‘स्पेशल 26’, ‘दो लफ्जों की कहाणी’, ‘मुंबई सागा’ या चित्रपटात काम केले आहे.

काजलने 2007मध्ये ‘लक्ष्मी कल्यानम्’ या चित्रपटातून तेलुगूमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही चांगली कमाई केली नाही. यानंतर तिने साऊथमध्ये ‘मगाधिरा’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने तिला खूप लोकप्रियता दिली.

काजलने 6 ऑक्टोंबर 2020 रोजी तिच्या लग्नाची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. तिने 30 ऑक्टोंबर 2020 रोजी व्यावसायिक गौतम किचलु याच्या सोबत लग्न केले.(sauth actress kajal aggarwals birthday lets know some unknown fact about her)

अधिक वाचा-
झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा टिझर रिलीज, स्टारकिड्सच्या धमाल शैलीने जिंकली चाहत्यांची मने
आलिया भट्टचा हॉट अंदाज चाहत्यांना लावतोय वेड, तुम्ही पाहिला का?

हे देखील वाचा