Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड डॉन ३ मध्ये प्रियांकाची जागा घेणार आता ‘ही’ अभिनेत्री, रणवीरसोबत पहिल्यांदाच झळकणार

डॉन ३ मध्ये प्रियांकाची जागा घेणार आता ‘ही’ अभिनेत्री, रणवीरसोबत पहिल्यांदाच झळकणार

‘डॉन 3’च्या घोषणेनंतर हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. आता डॉन 3 मध्ये शाहरुख खानच्याऐवजी रणवीर सिंग (Ranveer Singh) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर डॉन चित्रपटातील देसी गर्ल प्रियांका चोप्राची जागा कोण घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अनेक लोकप्रिय अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. अलिया भट, कियारा अडवाणी तर रणवीरची रिअल लाइफ पत्नी दीपिका पादुकोणचे नावही चर्चेत होतं. आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. फरहान अख्तरने ‘डॉन ३’ चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. टीझरमध्ये ‘डॉन’ची ओळख करून देण्यात आली होती. डॉन’च्या सिक्वेलमध्ये शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंगची भूमिका घेतल्याचे समजले. तर आता प्रियांका चोप्राची भूमिका कोण साकारणार आहे त्या अभिनेत्रिचे नावं रिलीज झालं आहे.

तर प्रियांकाची भूमिका कियारा अडवाणी साकारणार आहे. एक्सेल मूवीने नुकतचं एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये कियारा अडवाणीची एन्ट्री दाखवली आहे. ‘डॉन युनिव्हर्समध्ये कियारा अडवाणीचे स्वागत आहे.’ असं या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. पहिल्यांदाच कियारा रणवीरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. डॉनच्या आधीच्या दोन्ही भागांमध्ये प्रियांका दिसली होती. तिने मोनाची भूमिका साकारली होती.

डॉन 3’चे शूटिंग यावर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू होऊ शकते. सध्या चित्रपटाची टीम प्री-प्रॉडक्शनची पूर्ण तयारी करत आहे. ‘डॉन 3’ ची टीम सध्या चित्रपटाची कास्टिंग करत आहे आणि पुढील महिन्यात त्याचे प्री-प्रॉडक्शन सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमरान हाश्मी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘बेबी मला तुझी खूप आठवण येते’, म्हणत सुकेशने व्हॅलेंटाईन डेला जॅकलिनसाठी लिहिले खास पत्र
स्ट्रगल काळात नोराने सहन केलाय खूप अपमान, अशाप्रकारे मिळाले सुरुवातीचे काम

हे देखील वाचा