बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी ‘भूल भुलैया 2’ या सिनेमासाठी खूपच लाईमलाइटमध्ये आली आहे. ती तिच्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त असून, या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालू आहे. कियारा आणि कार्तिक यांचा ‘भूल भुलैया 2’ हा सिनेमा येत्या २० मे रोजी प्रदर्शित होत असून हा अक्षय कुमारच्या ‘भूल भुलैया’ सिनेमाचा रिमेक आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान कियाराने एका मुलाखतीमध्ये ‘एम .एस धोनी’ आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यावर भाष्य केले आहे. तिने सांगितले की सुशांतला ती एकदा म्हणाली होती की त्याच्यावर नक्कीच बायोपिक बनू शकते.
एका मुलाखतीमध्ये कियारा म्हणाली की, “आम्ही औरंगाबादमध्ये शूटिंग करत होतो. तिथे आम्ही सिनेमातील एक गाणे शूट करत होतो. मला आजही आठवते की, आम्ही पूर्ण दिवस शूटिंग केले. संध्याकाळी ८ वाजता आमचे पॅकअप झाले. सकाळी ४ वाजता आमची फ्लाईट होती. तेव्हा आम्ही विचार केला आता काय झोपायचे रात्रभर गप्पा मारू. आम्ही सर्वच खूप खुश होतो. तेव्हा मी सुशांतसोबत खूप वेळ घालवला आणि बरीच गप्पा मारल्या. त्याने मला त्याचा संपूर्ण प्रवास सांगितला. त्याने कसे इंजिनियरिंग केले, प्रीती झिंटासोबत बॅकग्राऊंड डान्सर पासून धोनी कसा मिळाला?, त्याच्याकडे असणारे पुस्तकांचे कलेक्शन आदी अनेक गोष्टी त्याने मला सांगितल्या. त्यावर मी त्याला म्हणले होते की, तुझा प्रवास एवढा रंजक आहे की, एवं दिवस त्यावर नक्कीच बायोपिक बनेल.’
पुढे ती सुशांतबद्दल म्हणाली की, “तो खूपच एनर्जेटिक होता. तो फक्त दोन तसेच झोपायचा. तो म्हणायचा की, मनुष्याला फक्त दोन तासाची झोप पुरेशी होती. सेटवर तो कधीच थकत नव्हता.” दरम्यान जून २०२० मध्ये सुशांत सिंग त्याच्या घरात मृत अवस्थेत सापडला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- चित्रपटांमध्ये अपेक्षित यश न मिळवलेल्या अभिनेत्री सोनल चौहानचे सिद्धार्थ मल्ल्यासोबत जोडले गेले नाव
- फॅशन सेन्ससोबत, वैयक्तिक आयुष्यातील खुलासे आणि हिंदू मुस्लिमांवर वक्तव्य ‘हे’ आहेत उर्फी जावेदचे गाजलेले विवाद
- परदेशात कॅटरिना कैफने केली बॉलिंग, तर विकीने घेतला जुन्या मित्रांसोबत आनंद, पाहा फोटो