चित्रपटांमध्ये अपेक्षित यश न मिळवलेल्या अभिनेत्री सोनल चौहानचे सिद्धार्थ मल्ल्यासोबत जोडले गेले नाव

बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीचा (Imran Hashmi) ‘जन्नत’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातून अभिनेत्री सोनल चौहानने (Sonal Chauhan ) सिने जगतात दमदार पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच चित्रपटात तिच्या बोल्ड लूकने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचेही जोरदार कौतुक झाले होते. पदार्पणातचं असा हिट चित्रपट देणाऱ्या सोनलचा सोमवार (१६ मे) ला वाढदिवस. जाणून घेऊ या तिच्या प्रवासाबद्दल रंजक किस्से. 

View this post on Instagram

A post shared by Sonal Chauhan (@sonalchauhan)

अभिनेत्री सोनल चौहान तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकसाठी चांगलीच लोकप्रिय आहे. सध्या सिने जगतात ती फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमी सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. 1987 मध्ये बुलंदशहरमध्ये जन्मलेल्या सोनल चौहानने इमरान हाश्मीच्या ‘जन्नत’ चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख न मिळाल्याने तीने दाक्षिणात्य सिने जगतात नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Sonal Chauhan (@sonalchauhan)

सोनलने हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोनल चौहान यूपीच्या राजपूत कुटुंबातील आहे. तिचे वडील पोलिस इन्स्पेक्टर आहेत. तर तिला एक मोठा भाऊ आणि दोन लहान बहिणीही आहेत. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने 2005 मध्ये मिस वर्ल्ड टुरिझमचा किताबही जिंकला होता. तिचा पहिला चित्रपट ‘जन्नत’ 2008 मध्ये रिलीज झाला होता.यामध्ये त्याची आणि इमरान हाश्मीची केमिस्ट्री चांगलीच पसंतीस उतरली होती. यानंतर त्यांनी ‘बुद्ध होगा तेरा बाप’, ‘3G’ सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. पण विशेष काही करू न शकल्याने तिने तेलुगुमध्ये एंट्री घेतली. तेलुगू सिने जगतात तिने ‘लिजेंड’ आणि ‘लायन’ या चित्रपटांमध्ये काम केले.

View this post on Instagram

A post shared by Sonal Chauhan (@sonalchauhan)

सोनल चौहान सध्या भलेही चित्रपटांमध्ये दिसली नसेल, पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत होती. मद्यसम्राट फरारी विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्यासोबत तिचे नाव नाव जोडले गेले. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांचे एकत्र फोटोही समोर आले होते.मात्र, सिद्धार्थ आणि सोनलने त्यांच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे बोलले नाही आणि कोणतेही वक्तव्य केले नाही. पण मीडियामध्ये त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post