Monday, July 1, 2024

कियारा आणि सिद्धार्थने केली लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना ‘ही’ विनंती, आयोजकांना देखील दिली ताकीद

आजपासून बॉलिवूडमधील बिग फॅट वेडींगला सुरुवात होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या लग्नाची तुफान चर्चा चालू होती. अथिया शेट्टी आणि केएल राहुल नंतर बॉलिवूडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नामुळे चांगलाच बज निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत होते. शिवाय मधल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या तुफान चर्चा मीडियामध्ये चालू होत्या. अखेर आता लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहे. दोघांच्याही लग्नाची जोरदार तयारी चालू असून, ते जैसलमेर येथे लग्न करणार असून, सिद्धार्थ आणि कियारा तिथे पोहचले आहे. आता त्याच्या लग्नाच्या बाबतीत एक अशी बाब समोर आली आहे, ज्यामुळे त्यांच्या लग्नाचे कनेक्शन कॅटरिना आणि विकी यांच्या लग्नाशी जोडले गेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी जोरदार गाजत आहे. त्यांच्या लग्नाचे सर्व फंक्शन जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये होणार आहे. आता या दोघांच्या लग्नाशी संबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हे समजत आहे की, त्यांनी देखील कॅटरिना आणि विकी यांच्याप्रमाणे त्यांच्या येणाऱ्या सर्व पाहुण्यांना एक विनंती केली आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांनी सर्वांना पाहुण्यांना फोटो आणि व्हिडिओ कुठेही पोस्ट न काढण्याची विनंती केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी आयोजकांना देखील याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे सांगितले आहे.

आतापर्यन्त समोर आलेल्या माहितीनुसार लग्नाला १०० पाहुण्यांना आमंत्रित केले गेले आहे. यामध्ये इंडस्ट्रीमधील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते मित्र आदींचा समावेश आहे. मात्र अजूनपर्यंत लग्नाला येणाऱ्या लोकांची निश्चित नावे समोर आली नाही. मात्र त्यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर त्याची पत्नी मीरा राजपूत हे हजर राहणार असल्याचे समजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना आज जैसलमेर एयर्पोर्टवर स्पॉट केले गेले. या दोघांच्या नात्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांची पहिली भेट ‘लस्ट स्टोरी’च्या एका पार्टीत झाली त्यानंतर त्यांनी ‘शेरशहा’मध्ये सोबत काम केले. जवळपास चारपेक्षा अधिक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता ते लग्न करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
VIDEO| तब्बल 50 वर्षानंतर मुमताज आणि धर्मेंद्र देओल पुन्हा एकत्र, पाहा व्हायरल व्हिडिओ

बिग बॉसची ही स्पर्धक दुसर्यांदा अडकणार लग्न बंधनात; मोठ्या बिझनेसमन बरोबर थाटणार संसार

हे देखील वाचा