बॉलिवूडमधून एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth malhotra) आणि कियारा अडवाणी यांना कन्या रत्न प्राप्त झाले आहे. मंगळवारी रात्री अभिनेत्री कियारा अडवाणीने एका मुलीला जन्म दिला आहे. कियारा अडवाणीने फेब्रुवारीमध्ये चाहत्यांना गरोदरपणाची आनंदाची बातमी दिली होती.
नेटिझन्स सिड-कियारा यांना त्यांच्या मुलीच्या जन्माबद्दल शुभेच्छा देत आहेत. एका युजरने लिहिले, ‘अभिनंदन’. दुसऱ्या युजरने लिहिले, ‘या पॉवर कपलला पालक झाल्याबद्दल अभिनंदन’. त्याच वेळी, नेटिझन्स असेही लिहित आहेत की ‘सर्व विद्यार्थ्यांना मुली झाल्या आहेत’. खरंतर, आपण ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटाबद्दल बोलत आहोत. त्यात आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिसले होते.
आलिया भट्टनेही मुलगी राहाचे स्वागत केले आहे. वरुण धवन देखील एका मुलीचा बाप आहे. आता सिद्धार्थ मल्होत्राच्या घरीही एका मुलीचा जन्म झाला आहे. यावर नेटकऱ्यांनी लिहिले आहे की, ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातील मुख्य कलाकारांना त्यांचे पहिले अपत्य, मुलगी झाली आहे’.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचे लग्न २०२३ मध्ये झाले. राजस्थानातील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या जोडप्याचे लग्न शाही पद्धतीने झाले. चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सनी या सोहळ्याला हजेरी लावली. ‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर या जोडप्याची प्रेमकहाणी सुरू झाली.
सिद्धार्थ मल्होत्राच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो ‘परम सुंदरी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २५ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. पण, त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता तो ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये जान्हवी कपूर सिडसोबत दिसणार आहे. त्याचबरोबर कियारा अडवाणी ‘वॉर २’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
छावा येणार टेलीव्हिजन वर; या तारखेला या वाहिनीवर बघता येणार सिनेमा…
छावा फेम विनीत कुमार सिंग दिसणार वेब सिरीज मध्ये; या दिवशी रंगीन होणार प्रदर्शित…