आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नानंतर चाहत्यांच्या नजरा अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाकडे लागल्या आहेत. कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांचेही नाव समोर येत होते. ‘शेरशाह’च्या ऑनस्क्रीन जोडीला खऱ्या आयुष्यातही पुन्हा एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती, पण त्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार नाही. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या दोघांनीही याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दोघांपैकी कोणीही आजपर्यंत या बातम्यांना दुजोरा दिला नव्हता. मात्र, दोघेही अनेक व्हेकेशन्सवर एकत्र स्पॉट झाले होते. मात्र सध्या सोशल मीडियावर कियारा अडवाणीचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती ब्रेकअपचे दुःख सांगताना दिसत आहे.
कियारा अडवाणीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या ब्रेकअपचे दुःख सांगताना दिसत आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या आधीही कियाराचे नाते होते. त्यानंतर ब्रेकअपबद्दल बोलताना म्हणाली की, “मी माझ्यासोबत आहे. माझ्या जवळ कोणी असलेल तर मला ते अजिबात आवडत नव्हते. मी माझ्या अंथरुणातून बाहेर येण्यासही तयार नव्हते. मला तिथेच राहायचे होते. माझ्या मित्रांनी मला सांगितले की, तुला त्या व्यक्तीतून बाहेर पडून रडणे थांबवावे लागेल. त्या माणसासाठी कधीही रडायचे नाही, जी तुम्हाला सोडून अशी दूर जाते. तू पुढे जा आणि लोकांशी कनेक्ट हो. जेणेकरून ते तुमच्या जीवनाचा एक भाग बनतील.”
दरम्यान काही महिन्यांपासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. त्या दोघांनीही कधीही या बातम्यांना दुजोरा दिला नसला, तरी अनेकदा ते एकत्र फिरताना दिसले होते. कियारा आणि सिद्धार्थच्या नात्याची चर्चा त्यांच्या ‘शेरशाह’ या चित्रपटापासून सुरू झाली होती. चित्रपटातील दोघांच्याही अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. मात्र आता त्यांच्या ब्रेकअप झाल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. मात्र याबाबत त्या दोघांनीही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-