×

एक्सप्रेशनने क्वीन असणाऱ्या रिंकू राजगुरूच्या नव्या व्हिडिओने झाले नेटकरी घायाळ, दिसल्या अनोख्या अदा

रिंकू राजगुरू अर्थात तुमची, आमची ‘आर्ची’. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ सिनेमाने रिंकूने मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केले आणि एका रात्रीत ती सुपरस्टार झाली. या सिनेमाने तिला न भूतो न भविष्यती असे यश मिळवून दिले. रिंकूने खूपच कमी काळात मराठीसह हिंदीमध्ये देखील तिच्या अभिनयाचा डंका वाजवत यश संपादन केले. आज रिंकू मराठी इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रिंकूने केवळ तिच्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर हे यश मिळवले आहे. सैराटमध्ये अतिशय बोल्ड, बिनधास्त अशा गावातील मुलीची भूमिका रिंकूने साकारली. या सिनेमातील तिची आणि परशाची जोडी देखील चांगलीच गाजली.

आज रिंकू एक ब्रँड म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावरही रिंकू कमालीची सक्रिय आहे. ती सतत तिच्या लाखो फॉलोवर्ससाठी तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिच्या पोस्टसाठी तिचे फॅन्स नेहमीच आतुर असतात. रिंकूने काहीही पोस्ट केले की ते व्हायरल व्हायलाच पाहिजे हा जणू एक अलिखित नियमच बनला आहे. पारंपरिक, वेस्टर्न सर्वच लूकमध्ये रिंकू तिचे फोटो पोस्ट करते तिच्या प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांचे भरभरून प्रेम मिळते.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

रिंकूने नुकताच तिचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू एका हिंदी गाण्यावर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न देखील विचारले आहे. रिंकूने ‘प्यार हुआ चुपके से ये क्या हुआ चूपके से’ या गाण्यावर घायाळ करणारे एक्सप्रेशन देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने जीन्स आणि पांढऱ्या रंगाचा टॉप घातला असून केस मोकळे सोडले आहे. हा व्हिडिओ तिने पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यानी तिला ती प्रेमात पडली आहे का? असा प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. ‘क्षणभर विचार थांबवा…आणि आयुष्य जे देतेय त्याचा आनंद घ्या’ असे कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला आहे. रिंकूने एकदा तिच्या रिलेशनशिपवर भाष्य करताना ती सिंगल असल्याचे सांगितले होते.

रिंकूच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तिने सैराट नंतर कागर, मेकअप या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. तर हिंदीमध्ये तिने हंड्रेड, २०० हल्ला हो, अनपॉज्ड आदी वेबसेरीजमध्ये काम केले आहे.

हेही वाचा-

Latest Post